• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

व्हायरस फ्री, निरोगी रोपांमुळेच उत्तम फळधारणा – इस्त्राईलचे राजदूत यअर ईशेल

जैन हिल्स च्या अभ्यास दौऱ्याप्रसंगी मधुमक्षिका पालनावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 12, 2023
in कृषी, जळगाव जिल्हा
0
व्हायरस फ्री, निरोगी रोपांमुळेच उत्तम फळधारणा – इस्त्राईलचे राजदूत यअर ईशेल

जळगाव, दि.१२ – जैन इरिगेशनच्या फळलागवड पद्धतीच्या सघन, अतिसघन लागवड तंत्रामुळे झाडांची संख्या वाढली. उत्पादनही वाढत आहे. मात्र चांगल्या दर्जाचे उत्पादन घेण्यासाठी खात्रीशील नियंत्रीत वातावरणातील मातृवृक्षापासून तयार झालेली व्हायरस फ्री, रोगमुक्त रोप व कलमांची लागवड शेतकऱ्यांनी करावी. यासाठी चांगल्या नर्सरीतून रोपांची निवड करणे महत्त्वाचे आहे.

एक सारखी रोपांची वाढ झाली तर फुलोरा अवस्थाही एक समान होऊन मधुमक्षिका ह्यांना परागिभवनाचे कार्य व्यवस्थीत करता येते. यातून फळधारणाही उत्तम होऊन निर्यातक्षम फळांचे उत्पादन होते. यासाठी मधुमक्षिका पालनाकडेही शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे; असे आवाहन हॉर्टिकल्चर व लसूण तज्ज्ञ आणि इस्त्राईलचे भारतातील राजदूत यअर ईशेल (Yair Eshel) यांनी केले.

जैन हिल्सच्या अभ्यास दौऱ्यात देशभरातील शेतकरी, कृषी अभ्यासक, विद्यार्थी भेट देत आहेत. आज फळबाग लागवड आणि उत्पादन वाढीसाठी मधुमक्षिकांची भूमिका यावर इस्त्राईलचे यअर ईशेल (Yair Eshel) यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, संजय सोन्नजे, अभिनव अहिरे, बी. डी. जळे, विकास बोरले, मिलींद पाटील, गोविंद पाटील उपस्थित होते.

जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर आंबा, केळी, भगवा डाळिंब, पेरू, मोसंबी, संत्रा, सिताफळ, चिकू यासह विविध फळबाग लागवड करण्यात आली आहे. विविध प्रकारची हळद आणि आले (अद्रक) लागवड आहे. देशभरातील नामवंत कांद्याचे वाण असलेल्या ८२ च्या वर कांद्याची लागवड केली आहे. यात कांद्याच्या सीड साठी उपयुक्त असलेले मधुमक्षिकांचे परागिभवन यावर प्रात्यक्षिकांसह यअर ईशेल (Yair Eshel) यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी जैन फार्मफ्रेश फूड प्रक्रिया उद्योगालाही भेट देऊन कांदा, लसुण यासह मसाल्यांवर होणारी प्रक्रिया समजून घेतली. नियंत्रीत वातावरणात असलेली मातृवृक्षापासून रोगविरहीत, व्हायरस फ्री रोपांची निर्मिती कशी होते यासाठी टिश्यूकल्चर विभागाचीही त्यांनी पाहणी केली.

Next Post
भारतरत्न मौलाना आजाद आदर्श पुरस्काराने प्रा. प्रिती पाटील-महाजन सन्मानित

भारतरत्न मौलाना आजाद आदर्श पुरस्काराने प्रा. प्रिती पाटील-महाजन सन्मानित

ताज्या बातम्या

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल
खान्देश

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

October 16, 2025
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
खान्देश

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

October 16, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group