पारोळा, दि. ०१ – तालुक्यातील टिटवी शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वन विभागाला यश आले.
दरम्यान बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती मिळताच वनविभागाचे पथक हे घटनास्थळी दाखल होऊन क्रेनच्या साह्याने पिंजरा विहिरीत सोडला.
यावेळी वनविभागाच्यावतीने बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. दरम्यान बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.