जळगाव, दि.२८ – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे महिलांसाठी स्तनांचे आजार, उपचार व तपासणी मार्गदर्शन मंगळवार १ मार्च रोजी करण्यात येणार आहे. महिलांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शल्यचिकित्सा विभागातर्फे करण्यात आले आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातर्फे विविध जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजार जडत आहेत. त्यात स्त्रियांना स्तनांविषयीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. याकरिता स्त्रियांना स्तनांच्या आजाराबाबत योग्य ती माहिती मिळावी तसेच योग्य ते उपचार होऊन औषधोपचार मिळावे याकरिता शल्यचिकित्सा विभागातर्फे १ मार्च पासून महिलांसाठी स्तनांचे आजार :उपचार व तपासणी मार्गदर्शन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ओपीडी कक्ष क्र. ११४ ब येथे सुरु करण्यात येत आहे.
सकाळी १० वाजता अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते या मार्गदर्शन उपक्रमाचं उदघाटन होणार आहे. महिलांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन शल्यचिकित्सा विभागातर्फे करण्यात आले आहे.