लालसिंग पाटील | भडगाव, दि. 01- पाचोरा, भडगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गावकऱ्यांसह शेतकऱ्यांना याचा जोरदार फटका बसलायं. दरम्यान तितुर नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. यात घरांमध्ये पाणी शिरल्याने देखील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. त्याचबरोबर शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे. अतिवृष्टीमुळे तितुर नदीला पूर आल्याने भडगाव, पाचोरा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.