लालसिंग पाटील | भडगाव, दि.31- गिरणा आणि मन्याड नदीच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांना पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान पाचोरा आणि भडगाव तालुक्यात गिरणा पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिलायं.
मन्याड प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने मन्याड व गिरणा नदीच्या काठावरील गावातील लोकांनी नदीत जावू नये तसेच आपली गुरे-ढोरे नदीच्या पाण्यात उतरवू नयेत. जिवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वांना सतर्कतेचा ईशारा देण्यात येत आहे. तसेच सर्वांनी आपली काळजी घ्यावी. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
दरम्यान गिरणा नदीला पूर आल्यास भडगाव, बांबरूड, पुनगाव, गिरड, अंतुर्ली, भातखंडे गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क रहाण्याचा इशारा देण्यात आलायं.