• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भारतीय किसान संघातर्फे दिल्ली येथे किसान गर्जना रॅली

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 15, 2022
in कृषी, जळगाव जिल्हा
0
भारतीय किसान संघातर्फे दिल्ली येथे किसान गर्जना रॅली

जळगाव, दि.१५ – लोकशाही राज्य स्थापन होऊन ७५ वर्षे झाली तरी शेतकऱ्यांना घटनादत्त आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही. यासाठी भारतीय किसान संघ आपल्या स्थापनेपासून शेतमालास संपूर्ण उत्पादन खर्चासह लाभकारी किंमत सरकारकडे मागत असून आजपर्यंत याविषयी अनेक वेळा प्रस्ताव पाठवले गेले, निवेदन दिली, आंदोलने झाली. मात्र तरीही दिलासादायक निर्णय कोणत्याही सरकारने घेतला नाही.

त्यासंदर्भात आता भारतीय किसान संघ १९ डिसेंबर ला आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीतील रामलिला मैदानावर लाखोंच्या संख्येने शेतकरी देशव्यापी किसान गर्जना रॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव महाजन यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.

महागाईच्या नावाखाली शेतमालाच्या किंमती सातत्याने नियंत्रित ठेवणे, शेतकऱ्याचा उत्पादन खर्च नाही निघाला तरी त्याची पर्वा न करणे, उत्पादकापेक्षा ग्राहकाला झुकते माप देणे, अशा सापत्न वागणुकीमुळे शेतकऱ्यांचा कर्जाचा डोंगर वाढला आहे. सरकारच्या या अन्यायकारक धोरणामुळे कर्जबाजारीपणाची शिक्षा शेतकरी भोगत आहे. शेती कर्ज वाढविणारा व्यवसाय ठरल्याने तरुण पिढी या व्यवसायामध्ये येण्याचे नाकारत आहे. ही देशासाठी भविष्यात अन्नसंकट निर्माण करण्याची धोकादायक घटना ठरू शकते. त्यासाठी देशभरातील लाखो शेतकरी देशाच्या राजधानी दिल्लीतील रामलिला मैदानावर १९ डिसेंबर रोजी किसान गर्जना रॅलीच्या माध्यमातून आक्रोश प्रकट करणार आहेत.

यात प्रामुख्याने पाच मागण्या ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण उत्पादन खर्चावर आधारित लाभकारी मूल्य मिळण्याची व्यवस्था झाली पाहिजे. सरकार कृषी निविष्ठां जसे खते बियाणे औजारे वरील भरलेला जीएसटी, क्रेडीट इनपुट देणार नसेल तर निविष्ठावर जीएसटी आकारू नये. कारण शेतकरी अन्ननिर्मितीसाठी निविष्ठा वापरतो, तो अंतिम ग्राहक नाही. तसेच किसान सन्मान निधीमध्ये पुरेशी वाढ व्हायला हवी. कारण, आज शेतकऱ्याचे उत्पन्न मजुराच्या उत्पन्नापेक्षाही कमी आहे.

शेतकरी कुटुंबे कर्जाखाली दबली गेली आहेत. रासायनिक खतांच्या कंपन्यांना दिले जाणारे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति एकराच्या प्रमाणामध्ये डीबीटीद्वारे दिले जायला हवे. विज्ञान संशोधनास आमचा विरोध नाही परंतु, वैज्ञानिक कसोटी, पर्यावरण व मानव सुरक्षा यांना अद्याप पात्र न ठरलेले जनुकीय वाण यांच्या क्षेत्र चाचण्या या त्वरीत थांबवाव्यात. तथापी मुबलक उत्पादन देणाऱ्या सुधारीत, संकरीत, पर्यावरणपुरक वाणांचे संशोधन, संवर्धन व प्रसार करावा आदी मागण्या भारतीय किसान संघातर्फे करण्यात आल्या आहेत.

तरी शेतकन्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढ्यामध्ये लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव महाजन, जिल्हामंत्री डॉ. दीपक पाटील यांनी केले आहे.


 

Next Post
‘चार भिंती’ चित्र प्रदर्शन हे प्रबोधनात्मक.. – अशोक जैन

'चार भिंती' चित्र प्रदर्शन हे प्रबोधनात्मक.. - अशोक जैन

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add