• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अमळनेर मतदारसंघातील १३० गावातील शेतकऱ्यांना मिळणार २ कोटी ६५ लक्ष रुपयांची नुकसान भरपाई

आमदार अनिल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 29, 2021
in कृषी
0
अमळनेर मतदारसंघातील १३० गावातील शेतकऱ्यांना मिळणार २ कोटी ६५ लक्ष रुपयांची नुकसान भरपाई

गजानन पाटील | अमळनेर, दि. 29 – अमळनेर मतदारसंघातील १३० गावातील शेतकऱ्यांना फेब्रुवारी २१ मधील वादळी वारा व अतिवृष्टीमुळे झालेल्या रब्बी पिकांच्या नुकसानीची भरपाई शासनातर्फे जाहीर करण्यात आली असून लवकरच वितरित होणार आहे यात अमळनेर तालुक्यासाठी २ कोटी ३३ लक्ष तर पारोळा तालुक्यातील गावांसाठी ३२ लक्ष रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. आमदार अनिल पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे.

अमळनेर विधानसभा मतदार संघात दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे अमळनेर तालुक्यातील ९५ व पारोळा तालुक्यातील ३५ गावांना फटका बसलेला होता. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या ज्वारी, मका, गहू, बाजरी व इतर रब्बी पिकांचे नुकसान झाले होते. यात अमळनेर तालुक्यातील १७२५.७६ हेक्टर वरील २८९४ तर पारोळा तालुक्यातील २३४.६२ हेक्टर वरील ७३३ शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झालेले होते. सदर बाधित क्षेत्राचे पंचनामे देखील तातडीने करण्यात आले होते. यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदत मिळवून दिल्याबद्दल आमदार पाटील व प्रशासनाचे आभार मानले. दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या शेतकऱ्यांना या मदतीमुळे दिलासा मिळणार आहे.

जिल्हयात सर्वाधिक मदत अमळनेर मतदारसंघाला

शासनाने व जळगाव जिल्हाधिकारी यांनी २५ ऑगस्ट २१ रोजी जाहीर केलेल्या नुकसानभरपाई मध्ये जिल्हाला एकूण ३ कोटी ४३ लक्ष रुपयांची मदत जाहीर केली असून यात अमळनेर विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २ कोटी ६५ लक्ष रुपयांची भरीव मदत मिळाली आहे यासाठी मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडवेट्टीवर, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

Tags: अमळनेरआमदार अनिल भाईदास पाटील
Next Post
विद्यार्थ्यांनी मोबाईल शी खेळण्यापेक्षा मैदानाशी खेळावे.. – आ.अनिल पाटील 

विद्यार्थ्यांनी मोबाईल शी खेळण्यापेक्षा मैदानाशी खेळावे.. - आ.अनिल पाटील 

ताज्या बातम्या

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम
आरोग्य

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम

May 30, 2026
आय.पी.एल. चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!
क्रिडा

आय.पी.एल. चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!

May 30, 2026
चोपड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हे

चोपड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हा दाखल

May 30, 2026
भुसावळात ३० हजारांची लाच मागणाऱ्या फौजदारासह खाजगी इसमावर गुन्हा; पोलीस उपनिरीक्षक फरार!
गुन्हे

भुसावळात ३० हजारांची लाच मागणाऱ्या फौजदारासह खाजगी इसमावर गुन्हा; पोलीस उपनिरीक्षक फरार!

May 29, 2026
पर्यावरण संरक्षणासाठी मोठे पाऊल: डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्प कार्यान्वित
जळगाव जिल्हा

पर्यावरण संरक्षणासाठी मोठे पाऊल: डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्प कार्यान्वित

May 29, 2026
विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था जागेसाठी​भाजपकडून डॉ. केतकी पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत!
जळगाव जिल्हा

विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था जागेसाठी​भाजपकडून डॉ. केतकी पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत!

May 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group