जळगाव, दि.२९- राज्यभरातून भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह राष्ट्रपुरुषांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून हटविण्यात यावे या मागणीसाठी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन करण्यात आले तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान जळगाव जिल्ह्यातील स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी जिल्हाधिकारी यांना राज्यपालांना पदावरून हटविण्याबाबत मागणी केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यावेळी सुनील प्रकाश देवरे, मनोहर सुकलाल शिंदे, चेतन रवींद्र पाटील, चेतन अनिल पाटील, दुर्गेश पाटील,अरुण जगताप, संदीप पाटील, हर्षल पाटील, सर्वेश दरेकर, निलेश पाटील, विकी पठाडे, गोपाल चव्हाण, सतीष सावकारे, पंकज सपकाळे, नितीन कोळी, अरविंद कोळी, शेखर पाटील, गणेश वंजारी यांच्यासह स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.