जळगाव, दि.२८ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत शहरातील सत्यम पार्क आणि आव्हाणे रोड परिसरातील तरुणांनी नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेचे राज्य उपाध्यक्ष विनय भोईटे यांच्यावर विश्वास ठेवून आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला असल्याचे तरुणांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले. महेंद्र सोनवणे, सतीश सैदाणे यांच्या प्रयत्नातून तरूणांचा प्रवेश संपन्न झाला.
यावेळी दुर्गेश पन्हाळे, कल्पेश पाटील, अथर्व शितोळे, हितेश पाटील, गौरव पाटील, प्रवीण चिल्लोरे, रितेश चौधरी, महेश वाघ, करण पवार, दीपक चिल्लोरे, विशाल सरदार या तरूणांनी राज ठाकरे यांचे विचार घरा घरात पोहचविणार असल्याचा निर्धार केला. तसेच तरूणांनी पक्ष शिस्त, पक्ष या बाबत सविस्तर माहिती जाणून घेत निस्वार्थी मनाने पक्षाचे काम करण्याचा संकल्प केला.
यावेळी दुर्गेश पन्हाळे यांची विभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष एड.जमील देशपांडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. पक्षप्रवेश व नियुक्ती या कार्यक्रमात अरुण इंगळे, महेंद्र सपकाळे, सतीश सैंदाणे उपस्थित होते.