जळगाव, दि.२८ – महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणाअंतर्गत राज्यात जिल्ह्याच्या ठिकाणी ग्रामीण व शहरी भागातील लोकांमध्ये वाचनसंस्कृतीमध्ये वाढ निर्माण व्हावी, या हेतुने जळगावात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत ‘ग्रंथोत्सव’ उपक्रम राबविण्यात आला.
यावर्षीचा ग्रंथोत्सव दिनांक २८ व २९ नोव्हेंबर असा दोन दिवस असून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय परिसर महाबळ कॉलनी, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
दरम्यान या ग्रंथोत्सव कार्यक्रमानिमित्त शहरातील सागर पार्क येथून ग्रंथ दिंडी काढण्यात येऊन महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षण विभागातील अधिकारी वर्ग यांच्यासह विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी या ग्रंथदिंडीत सहभाग घेतला.