धरणगाव, दि.२६ – येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धरणगाव तर्फे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाटील हे होते.
प्राचार्य डॉ.पाटील यांनी आपल्या मनातून संविधानामुळे आपली लोकशाही कशी बळकट झालेली आहे याचे मुद्देसूद विश्लेषण करून संविधान दिनाचे महत्त्व पटवून दिले. प्रास्ताविकामध्ये राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ.अभिजीत जोशी यांनी संविधानामुळे नागरिकांना मिळालेले कायदे स्वातंत्र्य याची माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अरुण वळवी, चोपडा विभागीय समन्वयक डॉ. संजय शिंगाणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गौरव महाजन आभार डॉ.ज्योती महाजन यांनी मानले, याप्रसंगी नॅक कॉर्डिनेटर प्रा. संदीप पालखे, प्रा.राजू केंद्रे, डॉ. वारडे डॉ.खरे, डॉ. गायकवाड, डॉ. कांचन महाजन, दिलीप चव्हाण, श्री तोडे, जितू परदेशी, परेश पाटील आदींसह शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थिती होते.