• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सव्वीस वर्षांनंतर राज्यभरातील मित्र आले एकत्र

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 2, 2022
in जळगाव जिल्हा
0
सव्वीस वर्षांनंतर राज्यभरातील मित्र आले एकत्र

गजानन पाटील | अमळनेर, दि. ०२ – तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा श्रीक्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिरावर निसर्गरम्य वातावरणात नुकताच संपन्न झाला. सन १९९५-९६ च्या दहावी वर्गातील आजी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी स्नेह मेळाव्यासाठी तब्बल २६ वर्षांनंतर दिवाळीच्या सुट्टीत वेळ काढून एकत्र आले. राज्यातील तसेच राज्याबाहेर नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले सुमारे ७० विद्यार्थी तसेच ५० च्या जवळपास विद्यार्थीनिनी “गेट टूगेदर”या कार्यक्रमात हजेरी लावली.

तब्बल २६ वर्षांनंतर गुरू व शिष्य दिवाळी निमित्ताने एकत्र आल्याने हा स्नेहमेळावा अतिशय उत्साहाच्या श्री क्षेत्र कपिलेश्वर या धार्मिक व पर्यटन स्थळी निसर्गरम्य वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य जी. आर. चौधरी हे होते. तर कार्यक्रमाला सेवानिवृत्त शिक्षक देखील उपस्थित होते. चांगल्या हुद्द्यावर असणारे विद्यार्थी विद्यार्थिनींचा देखील सत्कार करण्यात आला.

माजी विद्यार्थ्यांकडून आजी माजी शिक्षक यांना सन्मानित करून ऋननिर्देश व्यक्त करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी एकेक किस्से, गमती सांगत आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत मनोगत व्यक्त केले.

कळमसरे येथील व सद्या नोकरीनिमित्त नाशिक येथे स्थायिक असलेले नरेंद्र गणेश चौधरी यांनी उपस्थित शिक्षक व सर्वच मित्र मैत्रिणी यांना आठवण म्हणून श्रींची (गणपती) चांदीची सुबक व आकर्षक मूर्ती भेटवस्तू म्हणून दिली. सदरील स्नेहमेळावा कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवेंद्र राजपूत, सुदाम कोळी, प्रशांत राजपूत, प्रदीप पाटील, नंदू शर्मा, नरेंद्र चौधरी, नाना महाजन तसेच शिक्षक डी. डी. राजपूत, सूर्यवंशी सर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राखी पतील यांनी तर सूत्रसंचालन व्ही पी महाजन यांनी केले.

आजारातून जीवदान मिळालेल्या मित्राला आर्थिक मदत..
आपल्याच शाळेतील एक मित्र दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याची माहिती मैत्रिणींना मिळाली. आणि थेट किशोर माळी याचे घर गाठून त्याची विचारपूस करीत त्यास सुमारे पाच हजार रुपयांची आथिर्क मदत केली. मैत्रिणींच्या या अचानक भेटीने किशोर व त्याचे कटुंब भारावून गेले होते.

 


 

Next Post
परिवर्तनतर्फे रंगभूमी दिन साजरा

परिवर्तनतर्फे रंगभूमी दिन साजरा

ताज्या बातम्या

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा; जळगावात पटकावले विजेतेपद
क्रिडा

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा; जळगावात पटकावले विजेतेपद

January 20, 2026
जळगाव मनपा निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर संशय; सीसीटीव्ही फुटेजसह फेरमतमोजणीची माहिती देण्याची मागणी
Uncategorized

जळगाव मनपा निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर संशय; सीसीटीव्ही फुटेजसह फेरमतमोजणीची माहिती देण्याची मागणी

January 20, 2026
जळगावात ‘रामानंद’ हद्दीत कुंटणखान्यावर छापा; दोन परप्रांतीयांसह ४ महिलांची सुटका
खान्देश

जळगावात ‘रामानंद’ हद्दीत कुंटणखान्यावर छापा; दोन परप्रांतीयांसह ४ महिलांची सुटका

January 20, 2026
राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत २२ जानेवारीला; मंत्रालयात रंगणार ‘आरक्षण’ नाट्य
खान्देश

राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत २२ जानेवारीला; मंत्रालयात रंगणार ‘आरक्षण’ नाट्य

January 19, 2026
जिल्हा परिषदेच्या ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन; दिव्यांग प्रमाणपत्रात आढळली तफावत
खान्देश

जिल्हा परिषदेच्या ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन; दिव्यांग प्रमाणपत्रात आढळली तफावत

January 19, 2026
जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा प्रतिसाद
कृषी

जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

January 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group