जळगाव, दि. २२ – पोलीस शहिद स्मृतिदिननिमित्त देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या पोलीस तथा अर्ध सैनिक बलाच्या जवानांना शुक्रवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची उपस्थिती होती. यावेळी पोलीस उप निरीक्षक शेखर डोमाळे, योगेश गणगे, यांनी गेल्या वर्षभरात देशात शहिद झालेले पोलीस, केंद्रीय सुरक्षा दलाचे जवानांच्या नावाचं वाचन केले. मान्यवारांच्या हस्ते स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. लास्ट पोस्ट, राऊज धून वाजवून तसेच हवेत तीन फैरी झाडून शहिदांना मानवंदना देण्यात आली.
परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे प्लाटून कमांडर पोलीस उप निरीक्षक मंगल पवार, दिगंबर थोरात यांच्या नेतृत्वात शहिद स्मृती परेडच संचलन करण्यात आले. कर्तव्य बजावताना कोरोनाने निधन झालेल्या पोलिसांना नुकताच शहीदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यायोगाने कोरोनाने निधन झालेल्या जळगाव जिल्हा पोलीस दलातील सात शहिद पोलीस अंमलदार यांच्या कुटूंबियांना मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस दलाचा बंद पोलीस ध्वज प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी अमन मित्तल, जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, महापौर जयश्री महाजन, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, ए एस पी कुमार चिंथा तसेच डी वाय एस पी (गृह) संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नजन पाटील तसेच पोलीस अधिकारी, अंमलदार, स्वातंत्र्य सैनिक, शहिद परिवार कुटुंबीय, प्रतिष्ठित नागरीक, शिक्षक, विद्यार्थी, निवृत्त पोलीस अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाला पोलीस कल्याण विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुंनंदा पाटील, रावसाहेब गायकवाड, सतीश देसले, जयंत चौधरी, सुरेश राजपूत, प्रशिक्षक देविदास वाघ, सोपान पाटील, राजेश वाघ, रज्जाक सैय्यद, आशिष चौधरी, दीपक पाटील, हरिष कोळी, दिव्या मराठे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांनी केले.