• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

केसीई बीपीएड कॉलेजमध्ये खोखो स्पर्धेचे यशस्वी आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 17, 2022
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
केसीई बीपीएड कॉलेजमध्ये खोखो स्पर्धेचे यशस्वी आयोजन

जळगाव दि.१७ – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत जळगाव क्रीडा विभागाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांना नुकतीच सुरुवात झाली. दि.१६ ऑक्टोबर रोजी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात जळगाव क्रीडा विभाग अंतर्गत आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. साहेबराव भुकन, प्राचार्य डॉ. संजय ना. भारंबे, प्राचार्य डॉ. अशोक राणे, जळगाव विभाग क्रीडा समितीचे सचिव डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, सहसचिव डॉ. पी. आर. चौधरी व सहभागी महाविद्यालयांचे क्रीडा संचालक उपस्थित होते.

पुरुषांमध्ये नूतन मराठा कॉलेज, जळगाव यांनी विजेतेपद प्राप्त केले तर महिलांमध्ये डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाने विजेतेपद प्राप्त केले. या स्पर्धेत पुरुषांच्या सात आणि महिलांच्या एकूण पाच संघांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत पुरुषांमध्ये समाजकार्य महाविद्यालय, जळगाव यांनी द्वितीय क्रमांक तर मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव यांनी तृतीय क्रमांक पटकावला. महिलांमध्ये समाजकार्य महाविद्यालय, जळगाव यांनी द्वितीय क्रमांक तर शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय, जळगाव यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रा. अमर हटकर,विनोद वंडोळे,  गणेश वंडोळे,  निलेश हिवराळे व भावेश आहेरराव यांनी जबाबदारी सांभाळली. सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. निलेश जोशी, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. प्रवीण कोल्हे, प्रा. पंकज पाटील, प्रा. अतुल गोरडे,  विजय चव्हाण, रोहित पाटील,  तेजस महाजन आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

 


 

Next Post
‘डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शन आता भाऊंच्या उद्यानात

‘डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शन आता भाऊंच्या उद्यानात

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add