• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नेत्रदान चळवळीसाठी व्यक्तिगत स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक.. – विकास पाटील

मांगीलाल बाफना नेत्रपेढी व चिकित्सालयतर्फे चित्रकला स्पर्धा व बक्षीस वितरण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 29, 2022
in जळगाव जिल्हा
0
नेत्रदान चळवळीसाठी व्यक्तिगत स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक.. – विकास पाटील

जळगाव, दि. २९ – नेत्रदान चळवळ वाढविण्यासाठी आपल्या व्यक्तिगत स्तरावर सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील यांनी नेत्रदान-श्रेष्ठदान स्पर्धेच्या बक्षिससमारंभ प्रसंगी केले.

केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित मांगीलाल बाफना नेत्रपेढी व चिकित्सालयतर्फे ‘नेत्रदान-श्रेष्ठदान’ या विषयावर स्पर्धेचे आयोजन केले होते. देशभर नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा होणाऱ्या दि.२५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२२ दरम्यान नेत्रदान पंधरवड्याच्या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान नेत्रदान पंधरवडा निमित्ताने मांगीलाल बाफना नेत्रपेढी व चिकित्सालयच्या वतीने लहान मुलांमधील अॅम्लोपिया आजाराबद्दल जनजागृती करणारी चित्रफितचे विमोचन विकास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मंचावर शिक्षणाधिकारी विकास पाटील, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, जेष्ठ चित्रकार लिलाधर कोल्हे, मांगीलाल बाफना नेत्रपेढीचे प्रकल्प प्रमुख डॉ. धर्मेंद्र पाटील, नेत्रपेढी संचालक तुषार तोतला उपस्थित होते.

शालेयस्तर, महाविद्यालयीन व खुल्या गटात आयोजित केलेल्या यास्पर्धेत १५६ पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये शालेय गट प्रथम- वैष्णवी विनोद इखे, द्वितीय- यशश्री अविनाश शिंपी, तृतीय- प्रतिमा अतुल कदम, उत्तेजनार्थ- सोनाली मोहन माळी, महाविद्यालयीन गट प्रथम- तृप्ती गणेश महाजन, द्वितीय- समय अजय चौधरी, तृतीय- मंथन नितीन चौधरी, उत्तेजनार्थ- दिशा दिनेश पवार, खुला गट प्रथम- विजय गौतम अहिरे, द्वितीय- शामकांत प्रेमचंद वर्डीकर, तृतीय- चंद्रकांत पद्माकर नेवे, उत्तेजनार्थ- अदिती अविनाश जगताप

परिक्षक म्हणून लिलाधर कोल्हे, सचिन मुसळे, अविनाश मोघे यांनी काम बघितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी तर सूत्रसंचालन तुषार तोतला यांनी केले. यशस्वितेसाठी प्रदिप सोनवणे, शिवाजी पाटील, दिनेश सोनवणे, राजश्री डोल्हारे, किरण तोडकरी व केशवस्मृती सहकारी यांनी परिश्रम घेतले.

Next Post
विद्यापिठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्याची मनसेची मागणी

विद्यापिठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्याची मनसेची मागणी

ताज्या बातम्या

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !
जळगाव जिल्हा

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !

May 8, 2025
कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण
जळगाव जिल्हा

कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण

May 6, 2025
छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना
जळगाव जिल्हा

छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

May 6, 2025
ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन
आरोग्य

ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन

May 5, 2025
रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी
जळगाव जिल्हा

रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी

May 4, 2025
अनैतिक संबंधाच्या वादातून झाला तरुणाचा खून ! ; २४ तासाच्या आत चार जणांना अटक
गुन्हे

अनैतिक संबंधाच्या वादातून झाला तरुणाचा खून ! ; २४ तासाच्या आत चार जणांना अटक

May 4, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group