फराज अहमद | जामनेर, दि.२२ – तालुक्यातील हिवरखेडा त.वा.येथे ग्रामपंचायतीत २०१९-२० या वर्षात ग्रामपंचायतने गावात कामे न करता निधी काढल्याची तक्रार जनार्धन कुमावत यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
गावातील स्मशान भूमिजवळ असलेल्या नाल्यावर येण्याजाण्यासाठी मोरी तयार करण्याची ग्रामस्थांची मागणी होती. दरम्यान याठिकाणी मोरी ही फक्त कागदोपत्रीच तयार करण्यात आली असून त्याठिकाणी कुठलीही मोरी अस्तित्वात नाही. अशी तक्रार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. त्याच प्रमाणे अंगणवाडी दुरुस्ती साठी काढलेल्या निधीतून फक्त एक दरवाजा बसविण्यात आला. दलित वस्तीमध्ये पाच ते सहा वर्षापूर्वी पाण्याची टाकी बांधण्यात आली. मात्र त्या टाकी मध्ये आज पर्यंत एक थेंब देखील पाणी टाकण्यात आले नाही. तसेच पाण्याच्या टाकीसाठी पुन्हा दुरुस्ती करण्यासाठी देखील निधी काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
माझा काही संबंध नाही.. – ग्रामविस्तार अधिकारी
सरपंचाची मनमानी व ग्रामपंचायतीत चालेला भोंगळ कारभाराच्या तक्रारी सातत्याने जनार्धन कुमावत केल्या. हिवरखेडा त.वा.येथील ग्रामपंचायती संदर्भातील तक्रार ग्राम विस्तार अधिकारी पालवे यांना केली असता त्यांनी हा विषय माझ्याकडे नसून तो बांधकाम विभागाला जावून विचारा,. माझा काही संबंध नाही.
दरम्यान प्रशासनाकडून हिवरखेडा त.वा.येथील ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार व मनमानी कारभाराची चौकशी करणार का? असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे. यावेळी ग्रामपंचायतीत झालेला गैरव्यवहार याविषयी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.