• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्रीय एकात्मता मोटरसायकल तिरंगा रॅली

सै.नियाज अली भैय्या फाउंडेशनचा उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 14, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्रीय एकात्मता मोटरसायकल तिरंगा रॅली

जळगाव, दि. १४- भारतीय स्वतंत्र्य दिनानिमित्त तसेच या वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या दुग्धशर्करा योग जुळून आलेला असताना सै.नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे सर्व धर्मीय राष्ट्रीय एकात्मता मोटरसायकल तिरंगा रॅलीचे रविवारी उत्साहात आयोजन करण्यात आले.

या रॅलीची सुरुवात सकाळी १० वाजता सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून भिलपुरा चौकातून करण्यात आली. पुढे घाणेकर चौक, टावर चौक, नेहरू चौक, स्वातंत्र्य चौक, पांडे चौक, सुभाष चौक व परत भिलपुरा चौकात येऊन रॅलीचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी भारतीय स्वतंत्रता दिवस चिरायू होवो, हम सब एक है, जयषहिंद जय भारत अशा घोषणाही देण्यात आल्या.

सदर रॅलीच्या अग्रभागी भारत मातेची वेशभूषा केलेली एक लहान मुलगी शाहे झमन दानिश ही सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. रॅलीत सर्वांच्या हातात राष्ट्रीय ध्वज तिरंगा होता. या रॅलीचे नेतृत्व सै.अयाज अली नियाज अली यांनी केले. रॅलीची सांगता सामूहिक राष्ट्रगीत म्हणून करून करण्यात आली.

याप्रसंगी हिंदू धर्मगुरु पंडित देवीलाल व्यास, मुस्लिम धर्मगुरू मुजावर बाबा फैय्याज नुरी, शीख धर्म गुरु ग्यानी गुरुप्रीत सिंग, ख्रिश्चन धर्म गुरु फादर पास्टर यांच्यासह सुरेश चंद्रकांत माहुरे, फारुख शौकत, सुरज गुप्ता, योगेश मराठे, कामिल खान, सय्यद उमर, मनोज सेठिया, अनित मुजुमदार, सतीश वाणी, शेख शफी, काशिफ टेलर, रवींद्र खैरनार, अमित गौड, नाझीम कुरेशी, नाजीम पेंटर, शेख अब्दुल जुम्मन, सलमान मेहबूब, जुबेर रंग्रेज, नुर जावेद, जाफर खान, शेख आवेश, संतोष जाधव, जीशान हुसेन, शोएब याकुब, सय्यद आसिफ, शेख रफीक, दानिश हुसैन, नंदकुमार कासार, असलम नागोरी, मोहम्मद कैफ, शेख नजीर उद्दीन, रागीब वहाब यांसह सर्व धर्मीय लोक उपस्थित होते.

Next Post
जिल्हा पोलीस दल आयोजित अमृत दौडला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा पोलीस दल आयोजित अमृत दौडला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add