• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात जैन उद्योग समूहाचा सहभाग

८००० सहकाऱ्यांच्या घरावर लागणार राष्ट्रध्वज

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 11, 2022
in जळगाव जिल्हा
0
‘हर घर तिरंगा’ उपक्रमात जैन उद्योग समूहाचा सहभाग

जळगाव, दि.११ – स्वातंत्र्य लढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सांगता दि.१५ ऑगस्ट २०२२ रोजी होत आहे. देशासाठी बलिदान करणाऱ्या देशभक्तांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण अंत:करणात कायम जागते राहावे आणि आपला भारत देश सर्वांगीणदृष्ट्या सुजलाम सुफलाम राहावा ही सर्वांचीच मनोभूमिका आहे. त्यासाठीच केंद्र सरकारने ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करीत असताना १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ ही संकल्पना देशवासीयांसमोर मांडली आहे.

प्रस्तुत संकल्पनेला जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व जैन फार्म फ्रेश फूड्स लि. यांनी मातृभूमिच्या जाणिवेतून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जैन उद्योग समूहातर्फे ८००० सहकाऱ्यांना घरावर लावण्यासाठी राष्ट्रध्वज वितरित करण्यात येणार आहे. घरावर राष्ट्रध्वज लावण्यासाठी जैन पाईप देखील सर्व सहकाऱ्यांना देण्यात येणार आहे.

१३ ऑगस्टला कंपनीच्या सर्व आस्थापनांमध्ये ध्वजवंदनाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमानंतर सहकाऱ्यांसाठी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार असलेला ठेवा लक्षात रहावा म्हणून कंपनीत ठिकठिकाणी सेल्फी पॉइंटचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात जैन इरिगेशनचा प्रत्येक सहकारी हिरीरीने सहभागी होत आहे. यामुळे ८००० सहकाऱ्यांच्या घरावर राष्ट्रध्वज मोठ्या गौरवाने फडकणार असून राष्ट्रभावना प्रज्ज्वलित राहणार आहे.

Next Post
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रोषणाईने उजळले महापुरुषांचे पुतळे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रोषणाईने उजळले महापुरुषांचे पुतळे

ताज्या बातम्या

संतापजनक कृत्य! गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार, व्हिडिओच्या धमक्यांनी उकळले ६० लाख
खान्देश

संतापजनक कृत्य! गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार, व्हिडिओच्या धमक्यांनी उकळले ६० लाख

November 16, 2025
मोटारसायकल चोर धुळ्यातून जेरबंद! जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ३ मोटारसायकली जप्त
खान्देश

मोटारसायकल चोर धुळ्यातून जेरबंद! जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ३ मोटारसायकली जप्त

November 15, 2025
सुपोषित जळगाव उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन
खान्देश

सुपोषित जळगाव उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन

November 15, 2025
मनीषा चौधरी यांची प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव महिला महानगर अध्यक्षपदी निवड
खान्देश

मनीषा चौधरी यांची प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव महिला महानगर अध्यक्षपदी निवड

November 14, 2025
जळगावात बालकलावंतांसाठी ‘जल्लोष लोककलेचा’ कार्यक्रमाचे २८ व २९ नोव्हेंबर आयोजन
खान्देश

जळगावात बालकलावंतांसाठी ‘जल्लोष लोककलेचा’ कार्यक्रमाचे २८ व २९ नोव्हेंबर आयोजन

November 14, 2025
भडगावमधील त्या अल्पवयीन मुलींना राजस्थानमधून सुखरूप सोडवले! ०३ तरुण ताब्यात
खान्देश

भडगावमधील त्या अल्पवयीन मुलींना राजस्थानमधून सुखरूप सोडवले! ०३ तरुण ताब्यात

November 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group