यावल, दि.०४ – रावेर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांची आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच यावल येथे बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार चौधरी यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या वतीने प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान संपूर्ण राज्यभरात पदयात्रा काढणार आहे. त्या संदर्भात रावेर विधानसभा येथे यावल येथील यावल तालुका काँग्रेस कमेटी व कार्यकर्त्यांसोबत आमदार चौधरी यांनी चर्चा करून मार्गदर्शन केले.
यावेळी माजी आ. रमेश चौधरी, यावल तालुका काँग्रेस कॅमेटीचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर शेठ, तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, पंचायत समितीचे गट नेते शेखर पाटील, सर्फराज तडवी, सुनील फिरके, जावेद जनाब, शेतकी संघाचे संचालक अमोल भिरुळ, युवक काँग्रेसचे रावेर विधानसभा अध्यक्ष फैजान शाह, यावल शहराध्यक्ष कदिर खान, फैजपूर शहराध्यक्ष रियाज मेम्बर, माजी नगरसेवक केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे, माजी नगरसेवक समीर खान, समीर मोमीन, करीम कच्ची, पुंडलिक बारी, उमेश जावळे, चंद्रकला इंगळे आदींसह यावल तालुका काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी, सरपंच ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.