जळगाव, दि.३१ – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवासेना जळगाव महानगरतर्फे रविवारी शहरातील काव्यरत्नवली चौक व नेहरू चौक येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, महापौर जयश्री महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, निलेश चौधरी, विशाल वाणी, पियुष गांधी, अमित जगताप, प्रीतम शिंदे, अमोल मोरे, राहुल पोतदार, जय मेहता, अभिजित रंधे, सागर कुटुंबळे, महेश ठाकूर, गणेश गायकवाड, प्रशांत फाळके, उमेश चौधरी, गिरीश चौधरी, पंकज जोशी, निलेश जोशी, विलास पवार, बन्सी माळी, वासिम खान, ललित धांडे आदी उपस्थितीत होते.