जळगाव, दि.३० – पहिली महाराष्ट्र राज्य वरिष्ठ निवड बॅडमिंटन स्पर्धा २०२२ नांदेड येथे दिनांक २५जुलै ते २९ जुलै २०२२ दरम्यान झाली. या स्पर्धेत जैन स्पोर्टस अकॅडमी चा खेळाडू शुभम पाटील व प्रतिक रानडे हा पुरुष दुहेरी या गटात उपविजयी ठरला.
शुभम पाटील हा जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडू असून व त्याचा भागीदार प्रतीक रानडे हे दोघे सध्या ठाणे येथील श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे बॅडमिंटन अकॅडमी मध्ये सराव करीत आहे.
त्यांच्या या अतुनिय कामगिरी व पुढच्या वाटचालीसाठी जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष महेंद्र तेजा, सचिव विनीत जोशी, उपसचिव तनुज शर्मा, खजिनदार अरविंद देशपांडे, सदस्य चंद्रशेखर जाखेट, रवींद्र धर्माधिकारी व जैन स्पोर्टस अकॅडमीचे प्रशिक्षक किशोर सिंह यांनी शुभेच्छा देत कौतुक केले.