• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रभा जोशी यांच्या ‘घरंदाज सुर’ कार्यक्रमाचे आयोजन

स्व.वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 7, 2022
in मनोरंजन
0
प्रभा जोशी यांच्या ‘घरंदाज सुर’ कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव दि.०७ – स्व. वसंतराव चांदोरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि.९ जुलै २०२२ रोजी शहरातील कांताई सभागृहामध्ये करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्ताने नुकत्याच निधन झालेल्या भारतरत्न लतादीदींनी ना प्रतिष्ठानच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्याचा योग आला आहे.

लतादीदींनी गायलेल्या अभिजात संगीतावर आधारित रचनांचा “घरंदाज सूर” हा दृकश्राव्य अविष्कार असणार आहे. पुणे आकाशवाणी वर कार्यक्रम अधिकारी म्हणून सेवाव्रत असलेल्या प्रभा जोशी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यांना सहकार्य डॉक्टर मृणाल चांदोरकर करणार आहेत.

विख्यात गायिका लता मंगेशकर यांचा सूर म्हणजे साक्षात सरस्वतीचं मूर्त रुप..
भारतरत्न पुरस्कार प्राप्त लता मंगेशकर यांची किर्ती कित्येक वर्षांपासूनच जगभरात दरवळत राहीली. भारतीय चित्रपट संगीत क्षेत्राची ही जणु अनभिषिक्त सम्राज्ञी. दीनानाथ मंगेशकर यांच्या सारख्या महान गवैया कडून संगीताचा वारसा वंश परंपरेनी मिळाला तरी लता मंगेशकर यांची दैदिप्यमान कामगिरी घडली ती चित्रपट संगीत क्षेत्रात. भारतीय शास्त्रीय संगीताच्या महान परंपरेत ज्या दिग्गज गायिका होऊन गेल्या त्यात दीदींचं नाव आलं नाही. परंतु या दिव्य सूरांनी चित्रपट संगीतातूनही घरंदाज शास्त्रीय संगीताचे सगळे आदर्श दाखवत आपली वंश परंपरा आणि गायकी सिद्ध केली.

त्यांची ही वैशिष्ट्यपूर्ण गायकी सोदाहरण उलगडून दाखवणारा कार्यक्रम ‘घरंदाज सूर’ चुकवू नये, असा हा कार्यक्रम शनिवार दि.९ जुलै रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता कांताई सभागृहात संपन्न होणार आहे. तमाम जळगावकर रसिकांनी याचा आस्वाद घ्यावा. अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

Next Post
अट्टल मोटरसायकल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

अट्टल मोटरसायकल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबिर
जळगाव जिल्हा

अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबिर

June 2, 2023
उच्च तंत्रज्ञानामुळेच शाश्वत शेतीचा मार्ग; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा सुसंवाद
कृषी

उच्च तंत्रज्ञानामुळेच शाश्वत शेतीचा मार्ग; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा सुसंवाद

June 1, 2023
महिलेच्या पोटातून काढला साडेसात किलोचा गोळा !
आरोग्य

महिलेच्या पोटातून काढला साडेसात किलोचा गोळा !

June 1, 2023
निर्माल्य आता घंटागाडीत नव्हे तर निर्माल्य संकलन वाहनात द्या
जळगाव जिल्हा

निर्माल्य आता घंटागाडीत नव्हे तर निर्माल्य संकलन वाहनात द्या

May 31, 2023
कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक म्हणजेच ‘फाली’च्या ९ व्या संमेलनाचे आयोजन
कृषी

कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक म्हणजेच ‘फाली’च्या ९ व्या संमेलनाचे आयोजन

May 27, 2023
जैन इरिगेशनचे ३१ मार्च २०२३ ला संपणाऱ्या वर्षाचे एकल आणि एकत्रित आर्थिक निकाल जाहीर
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनचे ३१ मार्च २०२३ ला संपणाऱ्या वर्षाचे एकल आणि एकत्रित आर्थिक निकाल जाहीर

May 27, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.