जळगांव, दि. ०२ – गांधी रिसर्च फाउंडेशन आणि मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मेहरूण तलाव परिसरात एक हजार झाडे लावून सोमवारी दि.०४ जुलै ला वृक्षरोपणचा शुभारंभ करण्यात येणार आहे. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, महानगरपालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, जिल्हा वनअधिकारी विवेक होशिंग यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे.
मराठी प्रतिष्ठान गेल्या तीन वर्षापासून मेहरूण तलावाच्या काठावर सातत्याने वृक्षारोपणाचे काम करीत आहे. तसेच प्रतिष्ठान तर्फे वृक्षरोपण केलेल्या झाडांची देखरेख ठेवली जाते. दरम्यान मेहरुण तलाव परिसरात मशीनने खड्डे करण्याचे काम सुरु झाले असून खते व कीटनाशके टाकण्याचे काम सुरु आहे. मागील वर्षी लावलेल्या रोपांमध्ये मध्ये यंदा १००० रोपांचीची भर पडणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.
वृक्षरोपण हे दि.४ जुलै सकाळी ८.३० वाजता मेहरूण तलावावरील पक्षी घराजवळ करण्यात येणार असून वृक्षप्रेमी, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे असे आवाहन मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. जमील देशपांडे, सचिव विजय वाणी यांनी केले.