जळगाव, दि.१५ – जून महिना म्हटला की शाळा उघडण्याचे दिवस मात्र कोरोनामुळे तब्बल दोन वर्ष शाळेत न जाऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना आज शाळेच्या पहिल्या दिवशी आनंदाने शाळेत जाता आले. तालुक्यातील खेडी बुद्रुक येथे सौ. पा.तु.पाटील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि सौ. पी.टी.पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्वक गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
दरम्यान विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांसह खाऊ वाटप करण्यात आला. यसेच विविध प्रकारचे खेळ घेऊन प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे चेअरमन शांताराम तुकाराम पाटील, मुख्याध्यापिका मीनाक्षी नामदेव पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक संतोष पाटील यांच्यासह इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.