औरंगाबाद, दि.२३- कुटूंब व नातेवाईकासोबत आपण नेहमीच सण साजरे करत असतो. पण गरजवंत रुग्णांसोबत सण साजरा करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व्दिगुणित करता यावा यासाठी सुलक्ष्मी सेवाभावी संस्थेच्या वतीने घाटी रुग्णालयात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
शासकीय रुग्णालयातील महिलांना पेशंटला ‘एक राखी, एक साडी’ या उपक्रमाअंतर्गत साड्यांचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर प्रत्येक रुग्णांना औषधीसाठी १०० रूपये रोख रक्कम देत साड्या भेट दिल्या. दरम्यान महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
यावेळी ज्युनिअर चाँर्ली सोमनाथ स्वभावणे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून हसवत रुग्णांचा ताण कमी केला. माणुसकी व्हाँट्सप गृप व अनिल लुनिया व सु-लक्ष्मी चे अध्यक्ष सुमित पंडित व शिवप्रभाचे अध्यक्ष अमोल साईनवार यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम घेण्यात आला.
या उपक्रमाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. यावेळी ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावणे, समाजसेवक अनिल लुनिया, उप पोलीस निरिक्षक गोरक्षनाथ खरड, दिलीप जाधव,
डाँनियल जोसेफ, शंकर कानडे, मंगेश काळे, ह.भ.प.मावली महाराज शेलुदक, प्रकाश भागवत, समाजसेवक सुमित पंडित, विलास जाधव, विष्णु बोर्डे, जिजाभाऊ मिसाळ, परमेश्वर पंडित, राम पंडित, पुजा पंडित, लक्ष्मी पंडित आदींसह माणुसकी समुहाच्या सभासदांनी परीश्रम घेतले.