जळगाव, दि.२३- भाजपा जळगाव जिल्हा महानगर महिला आघाडीतर्फे समाजाचे रक्षक पोलीस कर्मचारी बांधाव यांना राखी बांधून रक्षाबंधन सण रविवारी जळगावात साजरा करण्यात आला. यावेळी महिला आघाडी तर्फे रक्षाबंधन निमित्त जळगाव शहर वाहतूक शाखा व पोलीस कंट्रोल रूम एस पी ऑफीस येथे पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
याप्रसंगी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा उज्वला बेंडाळे, अध्यक्ष दिप्ती चिरमाडे, सरचिटणीस रेखा वर्मा, नीतू परदेसी, रेखा कुलकर्णी, पूजा चौधरी, तृप्ती पाटील आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.