जळगाव, दि.१० – भारतीय जनता पार्टी आणि जैन प्रकोष्ठ च्या वतीने संचलित फिरत्या कर्करोग निदान केंद्रामार्फत करण्यात येणाऱ्या आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ सोमवारी जळगावात करण्यात आला. दरम्यान भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते फित कापुन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
‘कँन्सर मुक्त महाराष्ट्र’ या अभियाना अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात फिरत्या मोबाईल व्हॅन च्या माध्यमातून गरजूंच्या काही रक्तचाचण्या, दंत तपासणी, एक्स रे, स्त्रियांची मॅमोग्राफी, पॅप स्मिअर या तपासण्या मोफत करण्यात येणार असून ग्रामीण भागातील उपेक्षित घटकांसाठी ही सेवा कर्करोगाचे भयावह असे आव्हान रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
याप्रसंगी जैन प्रकोष्ठचे पदाधिकारी, भाजप महानगरचे अध्यक्ष दिपक सूर्यवंशी, दीप्ती चिरमाडे, नगरसेवक धीरज सोनवणे, अमित भाटिया, अनिल जोशी, भाजप वैद्यकिय आघाडी जिल्हा संयोजक डॉ. नरेंद्र ठाकूर आदींसह मान्यवर उपस्थित होते .