जळगाव, दि.२३ – पृथ्वीवरील प्रदूषित वातावरण कमी करण्यासाठी खारीचा वाटा म्हणून, डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी एम.आय.डी.सी. परिसरातील कॉलेज कॅम्पस व आजूबाजूच्या परिसरात एकूण शंभर झाडे लावून जागतिक वसुंधरा दिन उत्साहात साजरा केला.
याप्रसंगी दरवर्षी १०० झाडे लावून संपूर्ण एमआयडीसी परिसर हिरवागार करण्याचा मानस व शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. झाडे लावण्यासाठी गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.व्हि.एच.पाटील यांनी झाडे देऊन सहकार्य केले.
यावेळी विद्यार्थी विशाल राजपूत, संभाजी पाटील, अमोल जोशी, मंगेश लोहार, रामकृष्ण हिरे, सुनील चौधरी, कोमल करमचंदानी, अश्विनी लोहार, वैशाली कोराटे, गोकुळ पाटील, विश्वजीत जगताप, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य सतीश गाडगे, महाविद्यालयाच्या ग्रंथपाल मनीषा इंगळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी प्रदीप महाजन व अमोल चौधरी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन झाडे लावली.