• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मंगळग्रह मंदिरात विकासकामांचे उद्घाटन ; मान्यवरांनी केली संस्थेची प्रशंसा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 15, 2022
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
मंगळग्रह मंदिरात विकासकामांचे उद्घाटन ; मान्यवरांनी केली संस्थेची प्रशंसा

गजानन पाटील | अमळनेर, दि. १५ – येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळदेव ग्रह मंदिर परिसरात व परिसराबाहेरही सोमवारी विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन आणि संस्थेच्या नूतन माहिती पुस्तिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार अनिल पाटील, संतश्री प्रसाद महाराज, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, अनिल शिसोदे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंदिराच्या प्रांगणातील श्री तुळसाई उद्यानातील नवनिर्माण करण्यात आलेल्या जुन्या कारंजाचे तसेच मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच नवीन कारंजाचे उद्घाटन झाले. हे दोन्ही कारंजे संगणकीकृत असून, त्यांच्यात प्रत्येकी ४० प्रकारच्या विविध हालचाली आहेत. मंदिर प्रांगणातील परिसराचे नवनिर्माण करण्यात आले. तसेच मंदिराच्या संतश्वी सखाराम महाराज रोपवाटिका व सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचेही उद्घाटन झाले.

मंदिरात झालेल्या कार्यक्रमात मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे पोलिस उपअधीक्षक राकेश जाधव व पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या यशस्वी कार्याबद्दल तथा त्यांनी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे उभारणी अभियान सुरू केल्याबद्दल त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

आमदार अनिल पाटील म्हणाले, की विकासकामे करण्यात आणि आगळेवेगळे व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात मंगळग्रह सेवा संस्थेचे पदाधिकारी अत्यंत तरबेज आहेत. शासनाच्या माध्यमातून विविध योजना तथा निधी प्राप्तीसाठी कसे प्रयत्न करावेत, हे मंगळग्रह सेवा संस्थेकडूनच शिकावे. मी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने नजीकच्याच काळात भरीव शासकीय निधीच्या माध्यमातून मंदिराचा प्रचंड कायापालट होईल.

यावेळी खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष हरी वाणी, कार्यउपाध्यक्ष योगेश मुंदडे, संचालक विनोद पाटील, प्रदीप अग्रवाल, नीरज अग्रवाल, उपाध्यक्षा माधुरी पाटील तसेच माजी कार्याध्यक्ष जितेंद्र जैन यांचाही सत्कार करण्यात आला. डिगंबर महाने यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन.पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजीनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त जयश्री साबे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.


Next Post
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

ताज्या बातम्या

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता
जळगाव जिल्हा

मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता

July 11, 2025
जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल
गुन्हे

जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group