फराज अहमद | जामनेर, दि. १० – येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकार्यांच्या वतीने वकील सदावर्ते यांचा पुतळा दहन करत, भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी जामनेर शहरातील नगर परिषद चौकात आंदोलन करण्यात आले.
दरम्यान पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या निवासावर झालेल्या भ्याड हल्याची सखोल चौकशी करून संबंधीत या हल्यामागील खरे सुत्रधार शोधून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी संजय गरुड, डीगंबर पाटील, प्रदीपभाऊ लोढा, राजेंद्र पाटील, डॉ. प्रशांत पाटील, जितेश पाटील, विनोद माळी, विलास राजपुत, भगवान पाटील, खालीद साहेब, अहेफाज मुल्लाजी, संतोष झाल्टे, राजु नाईक, संदिप हिवाळे, कैलास अपार, वंदना चौधरी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.