जळगाव, दि. २८ – प्रेरणा दर्पण फाउंडेशनतर्फे दिला जाणारा ‘जीवन गौरव पुरस्कार’ शहरातील ओम साई रिअल इस्टेट कॅन्सलटन्टचे संचालक तथा ज्येष्ठ व्यवसायीक रमेशकुमार मुणोत यांना नुकताच जाहीर करण्यात आलायं. दरम्यान पुरस्कार वितरण सोहळा गुरवारी दिनांक ७ एप्रिल २०२२ रोजी होणार आहे.
चोपडा येथील प्रेरणा दर्पण फाउंडेशनच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दरवर्षी समाजातील विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात येते. दरम्यान जळगावातील रिअल इस्टेट मधील ज्येष्ठ व्यवसायीक रमेशकुमार मुणोत यांनी सामाजिक क्षेत्रात अमूल्य योगदान देत, उल्लेखनीय कार्याबद्दल चोपडा येथील प्रेरणा दर्पण फाउंडेशन या संस्थेने मुणोत यांना यंदा ‘जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर केलायं.
पुरस्कार सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, हास्य जत्रा फेम सचिन चौघुले यांची विशेष उपस्थिती लाभणार असून त्यांच्या शुभ हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहे.