जळगाव, दि.२६ – महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेमार्फत २८ नोव्हेंबरला तात्यासाहेब ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिना प्रित्यर्थ दरवर्षी तात्यासाहेब ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर केले जातात. यावर्षी दिल्या जाणाऱ्या प्राथमिकच्या व माध्यमिकचे असे एकूण ३९ पुरस्काराची घोषणा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ, प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब जगताप, विभागीय अध्यक्ष बी.एन.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
आदर्श सिंधी हायस्कूल जळगावच्या सपना रावलानी यांनी प्राथमिक विभागातील पुरस्कार निवड समिती प्रमुख म्हणून काम पाहिले. तर माध्यमिक विभागाचे निवड समिती प्रमुख म्हणून रणजित सोनवणे, जिल्हाध्यक्ष समता शिक्षक परिषद व जिल्हा उपाध्यक्षा प्रतिभा पाटील यांनी काम पाहीले. निवड समितीमध्ये पूर्व विभाग जिल्हाध्यक्षा मनीषा देशमुख, उपक्रम विभाग जिल्हाध्यक्ष मनोज नन्नवरे, महिला विभाग जिल्हाध्यक्षा छाया सोनवणे व उपाध्यक्ष हेमेंद्र सपकाळे यांनी गटप्रमुख म्हणून काम पाहिले. पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांना संघटनेमार्फत पुढे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सन्मानाने गौरविले जाणार आहे.
तात्यासाहेब ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार- (२०२१-२२) खालील प्रमाणे..
प्राथमिक विभाग
१. किरण छगन मोहिते, जि.प.प्राथमिक शाळा खेडी बुद्रुक तालुका अमळनेर
२. रवींद्र सुखदेव पाटील, जि.प.उच्च प्राथमिक शाळा पिंगळवाडे तालुका अमळनेर
३. अशोक चुडामण सोनवणे, केंद्रप्रमुख पंचायत समिती अमळनेर
४. विश्वनाथ गोरक्षनाथ पाटील, जि.प.केंद्रीय शाळा नागलवाडी तालुका चोपडा
५. विशाखा भावलाल सोनवणे, जि.प.प्राथमिक विद्यालय खडके तालुका एरंडोल
६. अनिल गोविंदराव पाटील, जगन भाऊ राठोड प्राथमिक आश्रम शाळा, करगाव तालुका चाळीसगाव
७. सविता सत्यवान जाधव, उदयसिंग अण्णा पवार प्राथमिक आश्रम शाळा वरखेडी बुद्रुक ता. चाळीसगाव
८. निलेश रामराव पाटील, जि.प.प्राथमीक शाळा निंभोरी तांडा ता. पाचोरा
९. भूषण दगडू पाटील, जि.प.प्राथमीक शाळा उतरण ता. पारोळा
१०. स्वप्निल रवींद्र निकम, कै.यादव दगडू पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी ता. भडगाव
११. हेमराज आधार पाटील, विवेकानंद प्रतिष्ठान, सावखेडा
१२. समाधान प्रभाकर कोळी, जि.प.प्राथमीक शाळा साकळी
१३. शेख हनीफ शेख रशीद, जि.प.प्राथमिक शाळा मोठे वाघोदे
१४. मनीषा शैलेश शिरसाठ, जि.प.उच्च प्राथमिक शाळा, पाळधी ता. धरणगाव
१५. रविंद्र रघुनाथ कठोरे, जि.प. वस्ती शाळा पूर्नाड ता. मुक्ताईनगर
१६. गणेश यशवंत कोळी, जि.प.प्राथमीक शाळा चिंचखेड ता. मुक्ताईनगर
१७. मनोज गोपाळराव किर्दक, जि.प.प्राथमिक केंद्र शाळा शेलवड ता. बोदवड
१८. कीर्ती बाबुराव घोगडे, जि.प.कन्या शाळा पहुर कसबे
१९. दिपाली पाटील, जि.प.शाळा साक्री तालुका
माध्यमिक विभाग
१. नरेंद्र अण्णाजी देशमुख, राधा गोविंद ज्ञानोदय विद्यालय खडकी ता. मुक्ताईनगर
२. किरण इंद्रसिंग पाटील, संत गाडगेबाबा विद्यालय, भुसावळ
३. हरिभाऊ भानुदास राऊत, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय पहूर ता. जामनेर
४. राजेंद्र झामरु गायकवाड, शि.रा.माध्यमिक विद्यालय किनोद ता. जळगाव
५. गिरीश हिरालाल जाधव, मानवसेवा माध्यमिक विद्यालय, जळगाव
६. नितीन कचरू जाधव, डॉ. दिवाकर खंडू चौधरी विद्यालय, डांभुर्णी ता. यावल
७. दिनेश आनंदराव जगताप, जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव
८. श्रीमती सरिता जगदीश मोरे, गिरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मेहुणबारे ता. चाळीसगाव
९. सिताराम नामदेव भदरे, श्री संत जनार्दन स्वामी बहुउद्देशीय संस्था घुसर्डी आश्रम शाळा ता.पाचोरा
१०. राजमल गोपीचंद नवाल, जे.एस.जाजू हायस्कूल उत्राण
११. शैलेश जगन्नाथ पाटील, स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय धुळ पिंपरी ता. पारोळा
१२. शिवाजी महादू माळी, तळई माध्यमिक विद्यालय तळई ता. एरंडोल
१३. मोहसीन पिंजारी, प्रताप माध्यमिक विद्यालय वडगाव ता. भडगाव
१४. चंद्रशेखर देवाजी ठाकूर, माध्यमिक विद्यालय लोणग्रुप ता. अमळनेर
१५. रतिलाल ताराचंद सोनवणे, सी.बी. निकुंभ माध्यमिक विद्यालय घोडगाव ता. चोपडा
१६. रामचंद्र जिवराम धनगर, पी.आर.हायस्कूल धरणगाव
१७. प्रा रेखा रूपचंद महाजन, झिपरु तोताराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा ता. चोपडा
१८.भगवान एकनाथ महाजन, शारदा विद्या मंदीर साकळी ता. यावल
१९. सौ.आर.के.भंगाळे, जि.डी.ढाके विद्यालय ऐणगाव ता. बोदवड
२०. मनीषा महिंद्र पाटील, धनाजी नाना माध्यमिक विद्यालय खिरोदा ता. रावेर