• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस ‘ताल सुरनका मेल’चे आयोजन

दसक्कर सिस्टर्स करणार कार्यक्रमाचे सादरीकरण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 4, 2022
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस ‘ताल सुरनका मेल’चे आयोजन

जळगाव, दि. ०४ – स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि भवरलाल ऍन्ड कांताबाई फाऊंडेशन तर्फे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस सोमवार दि. ७ मार्च रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता दसक्कर सिस्टर्स प्रेझेंटस् ‘ताल सुरनका मेल’ या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन कांताई सभागृहात करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या उदघाटन समारंभासाठी महापौर जयश्री महाजन, ज्योती अशोक जैन, डॉ.अनुराधा अभिजित राऊत, डॉ.अमृता प्रवीण मुंढे, तसेच डॉ.शिल्पा बेंडाळे आदी मान्यवरांची उपस्थिती राहील.

अश्विनी दसक्कर भार्गवे, ईश्वरी दसक्कर, गौरी दसक्कर, सुरश्री (पूजा) दसक्कर भगिनी या नाशिकमधील संगीत क्षेत्रातील नामांकित घराण्यांपैकी एक म्हणजे दसक्कर घराण्याच्या चौथ्या नवीन पिढीचे नेतृत्व करीत असून संगीतक्षेत्रात सतत नवनवीन, वेगवेगळे, वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग करीत असतात.

त्यांना संगीतकलेचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांचे सांगितिक शिक्षण आजोबा जेष्ठ संगीततज्ज्ञ पं. प्रभाकर दसक्कर काका माधव दसक्कर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संवादिनीवादक पं.सुभाष दसक्कर यांच्याकडे तसेच जयपूर ग्वाल्हेर किराणा घराण्याच्या गायकीचे शिक्षण विदुषी अलका देव मारुलकर व विदुषी मंजिरी असनारे केळकर यांच्याकडे झाले. लहानपणीच स्वराज्ञानासारखी अवघड गोष्ट सहज साध्य झाल्याने शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, अभंग, भजन, गौळण, भावगीते, गझल, फ्युजन यांबरोबरच हार्मोनियम आणि सिंथेसायझर वादनात त्या पारंगत आहेत. नुकतीच त्यांनी ‘ताल सुरनका मेल’ या अतिशय आगळ्या वेगळ्या दशरंगी प्रकारची निर्मिती केली. त्यांचे भारतात विविध प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये अनेक मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत गाण्याचे व वादनाचे कार्यक्रम झाले आहेत.

लहान मुलांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी कशी निर्माण करावी या विषयावर त्यांचे विशेष प्रेम व अभ्यास आहे. लहान मुलांवर संगीत कलेच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करणे त्यांना आवडते. त्यांनी आजवर बालसाहित्यातील अनेक कवितांना आकर्षक स्वररचना देऊन संगीतबद्ध केले आहे. काही नाटके व एका शॉर्टफिल्म साठी त्यांनी गाण्याची रचना व संगीत संयोजनाचे काम केले आहे.
दसक्कर सिस्टर्स या त्यांच्या युट्युब चॅनल, फेसबुक पेज व इन्स्टाग्राम पेजवर त्या नवनवीन प्रयोग सादर करत असतात.

चांदोरकर प्रतिष्ठानाने जळगावच्या सांस्कृतिक समृध्दी साठी सतत काहितरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. समस्त महिला वर्गाने चुकवू नये असा हा कार्यक्रम आहे. अर्थात तो सर्व रसिकांसाठी खुला आहे. कार्यक्रम ठीक ७ वाजता सुरू होईल रसिकांनी ६.५० पर्यंत आसनस्थ व्हावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.


Next Post
युवासेनेतर्फे विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप  VIDEO

युवासेनेतर्फे विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप VIDEO

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group