जळगाव | निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानतर्फे ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा आविष्कार कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील होत्या तर प्रमुख अतिथि विजय सोनवणे होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती प्रास्ताविकेतुन धीरज जावळे यांनी मांडली. भारत मातेच्या सुरक्षितेसाठी ज्या शुरविरानी आपल्या प्राणाची आहुती दिली त्याची आठवण म्हणून निःस्वार्थ क्लासेसच्या देवराज घेंगट, मोहित जावळे, मोहित घेंगट, जयेश सोनवणे, मयूर कोळी, उमेश चौधरी, तेजस पिंगळे या विद्यार्थ्यानी शहीद शूरवीरांवरील नाटिका सादरिकरण करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.
यावेळी पंकज व्यवहारे, श्रीपाद मराठे, प्रल्हाद जावळे, प्रभुदास जावळे, भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर, प्रणेश ठाकुर, अनिल वाणी, माजी क्रीडा अधिकारी किरण जावळे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धीरज जावळे, नकुल सोनवणे, गणेश देसले, सतीश जावळे, सुल्तान पटेल, पूनम ताड़े, खुशी सोनवणे आदींनी परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश जावळे व आभार प्रदर्शन शारदा सोनवणे यांनी केले.