• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनेकांनी नाकारले; मात्र गोदावरीने तारले

तीव्र हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांवर हृदयालयात जोखमीची एन्जीओप्लास्टी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 12, 2022
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
अनेकांनी नाकारले; मात्र गोदावरीने तारले

जळगाव, दि.१२ – छातीतील तीव्र वेदनेने विव्हळत असलेल्या रुग्णाने अनेक रुग्णालयाचे दार ठोठावले. मात्र रुग्णाची प्रकृती पाहत अनेकांनी त्यास नाकारले. अशा अवस्थेत हृदयालयात आलेल्या ५१ वर्षीय रुग्णाला गोदावरीने तारल्याचीच प्रचिती रुग्णाच्या कुटूंबियांना दिसून आली. सुट्टीच्यादिवशी सुद्धा रुग्णाला इमरजन्सी सेवा देत डीएम कार्डियोलॉजिस्ट यांनी तात्काळ एन्जीओप्लास्टी करत बंद असलेली रक्‍तवाहिनी मोकळी केल्याने रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे.

एका ५१ वर्षीय रुग्णाला छातीत वेदना झाल्या आणि त्यांना अस्वस्थता जाणवली, त्यात हृदयाची गती मंदावल्याने श्वासोच्छवासासही अडचण निर्माण झाली. अशा अवस्थेत नातेवाईकांनी रुग्णाला अनेक रुग्णालयात नेले मात्र प्रकृती फारच खालावल्याने रिस्क जास्त असल्यामुळे रुग्णालयांनी नाकारले मात्र डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाने तात्काळ रुग्णाला दाखल करुन घेत डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांनी तात्काळ ईसीजी, टू डी इको काढून घेण्यास सांगितले. दरम्यान रुग्णाला हृदयाचा तीव्र झटका आल्याचे निष्पन्न झाले. नातेवाईकांना रुग्णाच्या परिस्थीतीची माहिती देवून समुपदेशन करण्यात आले.

त्यानंतर लगेचच एन्जीओग्राफी करण्यात आली. मुख्य रक्‍तवाहिन्याच्या मुखाशी एक १०० टक्के ब्लॉक होता, त्यामुळे लगेचच एन्जोप्लास्टी करण्यात येवून स्टेन्टद्वारे तो ब्लॉक मोकळा करुन रक्‍तप्रवाहास मार्ग मोकळा करुन देण्यात आला. रूग्णाला काही वेळ मेडिसीन विभागाच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. आता मात्र रुग्णाच्या हृदयाचे ठोके पूर्ववत झाले असून रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.

डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, डॉ.प्रदिप देवकाते यांनी रुग्णाची एन्जीओप्लास्टी केली. त्यांना तंत्रज्ञ वैभव वाणी, जयेश जोशी, गोल्डी सावले, अमोल पाटील, दिपाली भामरे, कुंदन भंगाळे, ललिता भिरुड, डिंपल पाटील, राहुल नेहते, प्रांजली घोटांगले, सुरज नारखेडे आदिंचे सहकार्य लाभले.

हृदय रुग्णांसाठी गोल्डन अवर्स महत्वाचे..
छातीत कळा किंवा तीव्र वेदना जाणवल्यास हे हृदयविकाराचे सर्वात मोठे लक्षण मानले जाते. अशा परिस्थीतीतील हृदय रुग्णांसाठी गोल्डन अवर्स खुप महत्वाचे असतात. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांसाठी सुरवातीचे दोन तास आणि त्यानंतच्या १२ तासात एन्जीओग्राफी, एन्जीओप्लास्टी झाल्यास रुग्णाचा जीव वाचविण्यास मदत होते.

– डॉ.वैभव पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय

 


 

Tags: डाॅ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय
Next Post
गांधीजींच्या कान्हदेश तीर्थयात्रेत स्वराज्याची प्रेरणा : डॉ.विश्वास पाटील

गांधीजींच्या कान्हदेश तीर्थयात्रेत स्वराज्याची प्रेरणा : डॉ.विश्वास पाटील

ताज्या बातम्या

सीईओ करिश्मा नायर यांचा रावेर दौरा; ग्रामपंचायत ते आरोग्य केंद्रापर्यंत कामकाजाचा घेतला आढावा
जळगाव जिल्हा

सीईओ करिश्मा नायर यांचा रावेर दौरा; ग्रामपंचायत ते आरोग्य केंद्रापर्यंत कामकाजाचा घेतला आढावा

May 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

May 6, 2026
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध
जळगाव जिल्हा

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

May 6, 2026
हळदी समारंभात ‘गावठी कट्टा’ घेऊन फिरणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
गुन्हे

हळदी समारंभात ‘गावठी कट्टा’ घेऊन फिरणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

May 5, 2026
शिरसोलीत बंद घर फोडून ५ लाखांचा ऐवज लंपास; स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला
गुन्हे

शिरसोलीत बंद घर फोडून ५ लाखांचा ऐवज लंपास; स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला

May 5, 2026
पद्मालय येथे अंगारकी चतुर्थीचा उत्साह; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते महापूजा संपन्न
जळगाव जिल्हा

पद्मालय येथे अंगारकी चतुर्थीचा उत्साह; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते महापूजा संपन्न

May 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group