अमळनेर, दि. ०८ – पत्रकार आणि पत्रकारिता यांची व्याख्या सद्या खुपच बदललेली आहे. अनेक पत्रकार आज जाहिरात मिळावी या हेतूने प्रेरित होऊन बातम्या लावत असतात. परंतु आजही काही पत्रकार या गोष्टींना अपवाद आहेत. आणि त्यापैकी एक म्हणजे अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील निष्पक्ष व निर्भीड सच्चा पत्रकार आबासो प्रा.हिरालाल पाटील सर होय.
पत्रकारिता करीत असतानाच सामाजिक कार्याची आवड असणारे प्रा.हिरालाल पाटील यांनी कळमसरे येथे सलग दहा वर्षे माळी समाज पंच मंडळाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडीत वेळोवेळी समाज प्रबोधन देखील केले. हे करीत असतानाच महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे तालुकाध्यक्ष ते युवकचे जिल्हाध्यक्षपदाची धुरा देखील यशस्वीरित्या सांभाळली.
सरांची पत्रकारितेची खरी सुरुवात २००८ पासून सुरू झाली तर आज तागायत त्यांची लेखणीची धार अद्ययावतपणे सुरू आहे. ग्रामीण भागात पत्रकारिता करीत असताना परिसरातील विविध मूलभूत सुविधा, आर्थिक दुर्बल घटकांसाठी तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न मग ते अतिवृष्टी असो, अथवा पीक विम्याचा प्रलंबित विषय.. पत्रकारिताच्या माध्यमातून न्याय व मदत मिळवून देण्याचा नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो. आणि त्यामुळेच आजही त्यांचे नाव तालुक्यात व कळमसरे परिसरात सन्मानाने घेतले जाते.
पत्रकार म्हणजे फ़क्त एक बातम्या व जाहिरातींसाठी प्रयत्न करणारा व्यक्ती नसून एक समाजाचा आरसा आहे. समाजहितासाठी काय योग्य हे दाखवून देणारे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्त्व असल्याचे त्यांच्या विचारातून नेहमी स्पष्ट होत असते. समाजनिष्ठ व लोकोपयोगी पत्रकार म्हणून त्यांचेकडे नेहमीच पाहिले जाते.
आमचे बंधू आबासाहेब प्रा.हिरालाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल खूप काही लिहावं असच त्यांच कर्तृत्व आहे. भाऊंच्या बद्दल खूप काही लिहिण्यासारखं आहे. आबासाहेब वाढदिवसाच्या शुभेच्छा सोबतच त्यांनी महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे विचारांचा खजिना अखंडित पणे सुरू ठेवून, सामाज हिताची पत्रकारिता करण्यासाठी त्यांना अफाट शक्ती देवो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.
गजानन आर. पाटील, अमळनेर मो. ९८२३४ ७७५३९
(वाढदिवस अभिष्टचिंतन लेख)