• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी आयएमआरच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

उत्पादन प्रक्रियेचा घेतला प्रत्यक्ष अनुभवइलेक्ट्रिकल एमसीबीपासून ईव्ही चार्जर्सच्या निर्मितीपर्यंत विविध तांत्रिक प्रक्रियांची घेतली माहिती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 23, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
गोदावरी आयएमआरच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (ॠखचठ), जळगाव येथील बीसीए, एमसीए आणि एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी गोदावरी इंडस्ट्रियल आणि टेक्नोडिया इंडस्ट्रीज, जळगाव येथे औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना वर्गात आत्मसात केलेल्या सैद्धांतिक ज्ञानाचा प्रत्यक्ष उद्योगांमध्ये कसा उपयोग केला जातो, तसेच उत्पादन प्रक्रिया आणि औद्योगिक कामकाजाची पद्धत समजून घेता यावी, हा या भेटीमागील मुख्य उद्देश होता.या औद्योगिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकल एमसीबी (चउइ) निर्मिती, विविध घटकांचे उत्पादन व असेंब्ली, वेल्डिंग प्रक्रिया आणि पिव्होट पिन असेंब्ली यांची प्रत्यक्ष माहिती घेतली. तसेच थर्मल आणि मॅग्नेटिक लाईनवरील घटकांच्या निर्मिती प्रक्रियेची पाहणी केली. ईव्ही चार्जर्सचे उत्पादन तसेच चारचाकी वाहनांसाठी एसी टू डीसी (अउ ीें ॄउ) चार्जर्स तयार करण्याच्या प्रक्रियेचीही विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली.यावेळी उद्योगाचे प्लांट डायरेक्टर श्री. चेतन नारखेडे आणि प्लांट हेड श्री. प्रविण येवले यांनी विद्यार्थ्यांना विविध उत्पादन प्रक्रिया, तांत्रिक बाबी आणि औद्योगिक कामकाजाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.या भेटीमुळे विद्यार्थ्यांना उद्योगांमधील आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादन व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष कामकाजाचा जवळून अनुभव घेता आला. सैद्धांतिक ज्ञानासोबत व्यावहारिक कौशल्ये विकसित करण्यासाठी तसेच भविष्यातील करिअरच्या दृष्टीने औद्योगिक क्षेत्राची ओळख निर्माण करण्यासाठी ही भेट उपयुक्त ठरली.सदर औद्योगिक भेटीचे आयोजन इंडस्ट्रियल इंटरॅक्शन अँड व्हिजिट कमिटीच्या समन्वयक प्रा. रेणुका पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात आणि औद्योगिक क्षेत्राविषयीच्या समजुतीत मोलाची भर पडली.


 

Next Post
डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेजची गोदावरी व टेक्नोडिया इंडस्ट्रीजला औद्योगिक भेट

डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेजची गोदावरी व टेक्नोडिया इंडस्ट्रीजला औद्योगिक भेट

ताज्या बातम्या

पहूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; पिंपळगाव गोलाईत येथून चोरीला गेलेली बैलजोडी हस्तगत
खान्देश

पहूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; पिंपळगाव गोलाईत येथून चोरीला गेलेली बैलजोडी हस्तगत

October 23, 2026
दिक्षारंभ कार्यक्रमांतर्गत कृषी विद्यार्थ्यांची जैन हिल्सला शैक्षणिक भेट
खान्देश

दिक्षारंभ कार्यक्रमांतर्गत कृषी विद्यार्थ्यांची जैन हिल्सला शैक्षणिक भेट

October 23, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेजची गोदावरी व टेक्नोडिया इंडस्ट्रीजला औद्योगिक भेट
खान्देश

डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेजची गोदावरी व टेक्नोडिया इंडस्ट्रीजला औद्योगिक भेट

October 23, 2026
गोदावरी आयएमआरच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
जळगाव जिल्हा

गोदावरी आयएमआरच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

October 23, 2026
महापौर दीपमाला काळे यांच्या अचानक पाहणी दौऱ्याने प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती
जळगाव जिल्हा

महापौर दीपमाला काळे यांच्या अचानक पाहणी दौऱ्याने प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती

October 23, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !
जळगाव जिल्हा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

October 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add