• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद! १५ संघांना दहीहंडी फोडण्याची समान संधी

प्रवेश विनामूल्य; ६३ हजारांची रोख पारितोषिके अन् १० लाखांचा अपघाती विमा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 3, 2026
in Uncategorized, जळगाव जिल्हा
0
जळगावात युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद! १५ संघांना दहीहंडी फोडण्याची समान संधी

जळगाव, प्रतिनिधी : नारीशक्तीचा साहसी आविष्कार, युवतींच्या धाडसाचा थरार आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा जल्लोष अनुभवण्याची संधी जळगावकरांना शनिवारी, ५ सप्टेंबर रोजी मिळणार आहे. भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाउंडेशनतर्फे आयोजित ‘युवतींची दहीहंडी २०२६’ हा भव्य सोहळा सायंकाळी ६ ते रात्री ९.३० या वेळेत शिवतीर्थ मैदान (जी.एस. ग्राउंड) येथे रंगणार आहे. या सोहळ्यासाठी १५ महिला गोविंदा पथकांमधील तब्बल ६८५ युवतींचा कसून सराव सुरू असून, त्यांच्या मानवी मनोऱ्यांचा थरार पाहण्याची उत्सुकता जळगावकरांमध्ये निर्माण झाली आहे.

या दहीहंडी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, सहभागी होणाऱ्या युवतींच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. प्रत्येक महिला गोविंदाचा १० लाख रुपयांचा अपघाती विमा आयोजकांकडून उतरविण्यात आला आहे. दहीहंडीचा हा उत्सव सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील युवतींनी, कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नारीशक्तीच्या या धाडसी उपक्रमाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या स्वागत समिती प्रमुख डॉ. कल्याणी नागूलकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले.

किड्स गुरूकूल इंटरनॅशनल, अनुभूती स्कूल, आर.आर. इंग्लिश मीडियम स्कूल, उडाण फाऊंडेशन, केसीई मुलींचे वसतिगृह, अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय, एल.एच. पाटील पब्लिक स्कूल आणि हरिजन कन्या छात्रालय आदी शाळा-महाविद्यालयांमधील १५ संघ सहभागी होत आहेत. या संघांमधून तब्बल ६८५ महिला गोविंदा युवती सहभागी होणार असून, त्यांच्या साहसी मानवी मनोऱ्यांचा थरार शिवतीर्थावर अनुभवता येणार आहे.

दहीहंडीच्या माध्यमातून साहसासोबतच समता आणि समान संधीचा संदेश देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. हा केवळ स्पर्धेचा कार्यक्रम नसून उत्सव आहे, हे अधोरेखित करण्यासाठी सहभागी होणाऱ्या सर्व १५ संघांना दहीहंडी फोडण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी मैदानावर १५ दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत.

मागील वर्षीच्या दहीहंडीच्या समारोपावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी युवतींसाठी रोख पारितोषिके देण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेची यंदा पूर्तता करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकाच्या संघाला ३१ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकाला २१ हजार १११ रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या संघाला ११ हजार १११ रुपये, अशी एकूण ६३ हजार ३३३ रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट साहसी खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या युवतींचाही विशेष स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार असून, सहभागी सर्व संघांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

युवतींच्या दहीहंडीचा थरार वाढविण्यासाठी विविध सांस्कृतिक आणि साहसी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शौर्यवीर’ आणि ‘महाबली’ या दोन ढोल पथकांमधील तब्बल २१३ ढोलवादक आपल्या दमदार वादनाने वातावरण दणाणून सोडणार आहेत. मर्दानी खेळ, चिमुकल्यांसाठी सांस्कृतिक नृत्य, रिदमिक योगा, लाईव्ह सिंगिंग, स्लाईन डीजे, लेझर शो आणि आकर्षक फटाक्यांची आतषबाजी हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

शहरातील १५ रिल्स स्टार युवतींचाही या उत्सवात सहभाग राहणार असून, त्यामुळे तरुणाईमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे. चिमुकल्यांसाठी मल्लखांबासह विविध साहसी खेळांचे प्रदर्शनही या वेळी पाहायला मिळणार आहे. नारीशक्तीच्या सामर्थ्याचा जागर करणाऱ्या या अनोख्या सोहळ्यास जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवतींच्या धाडसाला दाद द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


 

Next Post
भुसावळात बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक

भुसावळात बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक

ताज्या बातम्या

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास
जळगाव जिल्हा

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

October 20, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 20, 2026
नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्र व ध्वजपूजन सोहळा संपन्न
जळगाव जिल्हा

नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्र व ध्वजपूजन सोहळा संपन्न

October 20, 2026
पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश
जळगाव जिल्हा

पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश

October 19, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
आरोग्य

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

October 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा
खान्देश

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा

October 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add