• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा

आमदार राजूमामा भोळे यांचे विशेष सहकार्य; पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कौतुकास्पद उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 3, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा

जळगाव, प्रतिनिधी : बातमीच्या शोधात शहरापासून ग्रामीण भागापर्यंत दिवसभर दुचाकीवरून धावपळ करणाऱ्या पत्रकार आणि छायाचित्रकारांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने प्रेस फोटोग्राफर फाउंडेशन, जळगाव यांच्यातर्फे महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. फाउंडेशनच्या वतीने जळगाव शहरातील सदस्य, वृत्तपत्रांचे छायाचित्रकार तसेच डिजिटल मीडिया प्रतिनिधींसाठी मोफत अपघाती विमा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमांतर्गत सुमारे १०० पत्रकार व मीडिया प्रतिनिधींचा प्रत्येकी १० लाख रुपयांचा अपघाती विमा काढण्यात आला. त्यामुळे संबंधित पत्रकाराचा अपघाती मृत्यू किंवा विमा योजनेतील नियमानुसार अपघाती दुखापत झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळण्यास मदत होणार आहे.

पत्रकारांचे काम हे केवळ कार्यालयापुरते मर्यादित नसते. अपघात, गुन्हे, नैसर्गिक आपत्ती, राजकीय कार्यक्रम, सामाजिक उपक्रम तसेच विविध घटनांचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार आणि छायाचित्रकारांना दिवस-रात्र शहरासह ग्रामीण भागात प्रवास करावा लागतो. अनेकदा तातडीच्या बातमीसाठी धावताना त्यांना वाहतुकीच्या धोक्यांनाही सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत पत्रकारांच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता मिळावी आणि पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने हाताळला जावा, या उद्देशाने फाउंडेशनने हा उपक्रम राबविला.

या सामाजिक उपक्रमासाठी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांचे मोलाचे व विशेष सहकार्य लाभले. पत्रकारांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या सुरक्षेसाठी सहकार्य केल्याबद्दल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार भोळे यांचे आभार व्यक्त केले.

हे विमा शिबिर प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुमित देशमुख, प्रभारी अध्यक्ष सचिन पाटील, सचिव अभिजीत पाटील आणि सहसचिव हेमंत पाटील यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून यशस्वीरीत्या पार पडले.

शिबिराच्या आयोजनासाठी प्रकाश लिंगायत, जुगल पाटील, भूषण पाटील, अरुण इंगळे, संधीपाल वानखेडे आणि पांडुरंग महाले यांनी विशेष परिश्रम घेतले. विमा शिबिराच्या माध्यमातून पत्रकारांच्या आरोग्य व आर्थिक सुरक्षेच्या प्रश्नाकडे सकारात्मक पाऊल टाकण्यात आल्याने पत्रकार वर्गातून या उपक्रमाचे स्वागत व कौतुक होत आहे.

पत्रकारांच्या व्यावसायिक कामासोबतच त्यांच्या कुटुंबाच्या भवितव्याची काळजी घेणे हीदेखील सामाजिक जबाबदारी आहे. या भावनेतून भविष्यातही पत्रकारांच्या हितासाठी विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि सुरक्षा उपक्रम राबविण्याचा मानस प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


 

Next Post
स्व. गोदावरी आई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

स्व. गोदावरी आई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

ताज्या बातम्या

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास
जळगाव जिल्हा

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

October 20, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 20, 2026
नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्र व ध्वजपूजन सोहळा संपन्न
जळगाव जिल्हा

नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्र व ध्वजपूजन सोहळा संपन्न

October 20, 2026
पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश
जळगाव जिल्हा

पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश

October 19, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
आरोग्य

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

October 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा
खान्देश

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा

October 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add