• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 1, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

जळगाव, प्रतिनिधी : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील मुलींच्या वसतिगृहात कायमस्वरूपी श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व स्थापना सोहळा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण वसतिगृह परिसर दुमदुमून गेला.

या मंगलमय सोहळ्यास मा. डॉ. उल्हास पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच मा. डॉ. वैभव पाटील, मा. डॉ. प्रशांत सोळंके, मा. डॉ. प्रेमचंद पंडित आणि प्रमोद भिरूड,अधीक्षिका हर्षा कोल्हे, प्राचार्या प्रा. डॉ. विशाखा गनवीर, उपप्राचार्या प्रा. जॅसिंथ धया, डी.के.पी.सी.ओ.एन.चे प्राचार्य शिवानंद बिरादार, मुख्य परिचारिका अधीक्षक संकेत पाटील तसेच उपमुख्य परिचारिका अधीक्षिका मनीषा खरात यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात पुरोहीत संदीप का.वैदय यांनी कर्मचारी गणेश नांदुरकर यांच्या हस्ते सपत्नीक विधीवत मंत्रोच्चाराच्या मंगलमय वातावरणात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व स्थापना करून घेतली.यानंतर आरती करण्यात आली. वसतिगृहातील विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने या सोहळ्यात सहभाग घेतला.

यावेळी सर्वांच्या सुख-शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यशासाठी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

September 1, 2026
तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्हा

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन

September 1, 2026
इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा
खान्देश

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

September 1, 2026
गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add