• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

नगरसेवक देशमुखांच्या पाठपुराव्याला यश; सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायद्यांतर्गत कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 1, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

जळगाव, प्रतिनिधी : पाळधी ते जळगाव दरम्यानच्या नवीन बायपास रस्त्यावरील खचलेला भराव आणि सुरक्षा उपायांचा अभाव यामुळे सातत्याने होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत जळगाव तालुका पोलिसांनी कंत्राटदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. नगरसेवक अरविंद देशमुख यांनी ८ ऑगस्टपासून केलेल्या प्रदीर्घ व पुराव्यानिशी पाठपुराव्यानंतर पोलिसांनी ‘ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स’चे एमडी शैलेंद्र सिंघल, जीएम दत्ता व साईट अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

महामार्गावर ५ ऑगस्टपासून मंगला माळी, प्रेमराज चौधरी, योगेश महाजन आणि अनिरुद्ध डहाके यांचे अपघातात बळी गेले होते. नगरसेवक देशमुखांनी NHAI, पोलीस व जिल्हाधिकाऱ्यांकडे संयुक्त बैठक, रोड सेफ्टी ऑडिट व कंत्राटदारांवर कारवाईची मागणी लावून धरली होती. मात्र, दुर्लक्ष झाल्याने ३० ऑगस्टच्या मध्यरात्री आसोदा बायपासवर झालेल्या अपघातात शांताराम पाटील या ५८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.

या अपघातात तवेरामधील चौघे गंभीर जखमी झाले. अपघातस्थळी कोणतेही बॅरिगेटिंग, रिफ्लेक्टर्स किंवा सूचना फलक नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी कंत्राटदार कंपनीच्या निष्काळजीपणावर थेट भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०५ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला.

जळगावकरांच्या सुरक्षेसाठी व मृतांच्या नातेवाइकांना न्याय मिळवून देण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना शिक्षा होईपर्यंत हा लढा सुरूच राहील, असे प्रतिपादन नगरसेवक अरविंद देशमुख यांनी केले.

Tags: accidentarwind deshmukhCrimeJalgaon

ताज्या बातम्या

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा
खान्देश

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

September 1, 2026
गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add