• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

युवासेनेचे आरोग्यविषयक कार्य उल्लेखनीय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण शिबिरास उत्तम प्रतिसाद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 16, 2022
in आरोग्य, सामाजिक
0
युवासेनेचे आरोग्यविषयक कार्य उल्लेखनीय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, दि. १६ – कोरोना काळात युवासेनेने नागरिकांसाठी केलेले आरोग्यविषयक कार्य सर्वांना ज्ञात आहे. सर्व बंद असताना युवासैनिक रस्त्यावर उतरून नागरिकांच्या आरोग्यासाठी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी, होम क्वारंटाईन, कोरोनाविषयी जनजागृती, गरजूंना जेवण वाटप, पोलीस व आरोग्य सेवकांना लागेल ती मदत यासारखे अनेक कार्यामध्ये युवासेनेचे कार्यकर्ते सक्रीय होते.

3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाची सुरूवात करण्यात आली असून जळगाव शहरातील मूळजी जेठा महाविद्यालय, आय.एम.आर. महाविद्यालय, के.सी.ई. अभियांत्रिकी महाविद्यालय, ओरीयन, ए.टी.झांबरे, भगीरथ, रुस्तमजी इंटरनॅशनल स्कुल यासह अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन युवासेनेने जळगाव शहर महागनगर पालिका यांच्या सहकार्याने लसीकरण शिबीराचे यशस्वी आयोजन करून घेत अंदाजे 12 हजार विद्यार्थ्यांपर्यंत लाभ पोहचविला.

शुक्रवारी शहरातील गणेशवाडी भागात युवासेनेतर्फे 15 ते 18 वयोगट तसेच फ्रंटलाइन वर्कर्स व ज्येष्ठ नागरिकांसाठी बुस्टर डोज लसीकरण शिबीराचे आयोजन केले होते. शिबीराचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा.ना. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री यांनी “युवासेनेचे आरोग्यविषयक कार्य उल्लेखनीय व आदर्श आहे” असे उद्गार व्यक्त केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, महापौर जयश्री महाजन, माजी महापौर नितिन लढ्ढा, उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख राध्येशाम कोगटा, युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव विराज कावडीया, युवासेना विस्तारक किशोर भोसले, जिल्हा युवा अधिकारी शिवराज पाटील, महानगर युवा अधिकारी स्वप्निल परदेशी, विशाल वाणी, युवतीसेना उपशहरप्रमुख वैष्णवी खैरनार, विभाग प्रमुख अमोल मोरे, उमाकांत जाधव, अमित जगताप, शिवसेना उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, प्रसिद्धी प्रमुख उमेश चौधरी, प्रकाश कावडीया, जितेंद्र छाजेड, पंकज बिर्ला, रवि शर्मा, नंदू पाटील, कुंदन काळे, चंद्रकांत मराठे आदि उपस्थित होते.

शिबीराचे आयोजन 14 व 15 जानेवारी 2022 दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत नानीबाई कॉम्प्लेक्स, गणेशवाडी येथे करण्यात आले होते. तरी जास्तीत नागरिकांनी पुढील लसीकरण शिबिरात लाभ घ्यावा असे आवाहन युवासेना सहसचिव विराज कावडीया यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवासैनिक प्रितम शिंदे, आर्यन सुरवाडे, पवन चव्हाण, समिर कावडीया, पियुष गांधी, यश सपकाळे, हितेश ठाकरे, शंतनू नारखेडे यांनी परिश्रम घेतले.

Next Post
भाजयुमोच्या कार्यकर्त्यांविरोधात युवासेनेचे पोलिस अधीक्षकांना निवेदन

भाजयुमोच्या कार्यकर्त्यांविरोधात युवासेनेचे पोलिस अधीक्षकांना निवेदन

ताज्या बातम्या

जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावात वाहतुकीचे नियोजन
खान्देश

जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावात वाहतुकीचे नियोजन

October 3, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

तीन गावठी कट्टे, आठ जिवंत काडतुसे जप्त; तिघांना अटक

October 3, 2026
अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर
Uncategorized

अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर

October 3, 2026
अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर
जळगाव जिल्हा

अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर

October 3, 2026
अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झालेल्या २४ वर्षीय तरूणावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झालेल्या २४ वर्षीय तरूणावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

October 3, 2026
भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न; खुल्या गटाच्या शहरी विभागात भैरवी ग्रुप प्रथम
जळगाव जिल्हा

भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न; खुल्या गटाच्या शहरी विभागात भैरवी ग्रुप प्रथम

October 3, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add