• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 1, 2026
in आरोग्य
0
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

जळगाव, (प्रतिनिधी) : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागात १ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत साजर्‍या होणार्‍या जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.

या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, विभागप्रमुख डॉ. माया अर्वीकर, डॉ. वैभव पाटील, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.तेजस सोनवणे, डॉ.मृदूला मुंगसे, डॉ. रश्मी संघवी, डॉ.प्राजक्ता पाटील, डॉ. साक्षी पटवारी, डॉ. संस्कृती भिरूड, डॉ. सिध्दी संके, पूजा गजरे, प्रतिक्षा जुमडे यांचेसह विभागातील प्राध्यापक, निवासी डॉक्टरांची प्रमुख उपस्थिती होती.

स्तनपानाचे महत्त्व, माता व बालकांच्या आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम आणि स्तनपानाबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी स्तनपान हे बालकाच्या उत्तम शारीरिक व मानसिक विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. नवजात बालकाला जन्मानंतरच्या पहिल्या तासात स्तनपान देणे तसेच पहिल्या सहा महिन्यांपर्यंत केवळ स्तनपानावर भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

सप्ताहादरम्यान विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गर्भवती व स्तनदा मातांसाठी समुपदेशन सत्रे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पोस्टर सादरीकरण, आरोग्य शिक्षण कार्यक्रम, प्रश्नोत्तर सत्रे तसेच स्तनपानाबाबत जागरूकता निर्माण करणारे उपक्रम राबविण्यात येत आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या माता व त्यांच्या कुटुंबीयांनाही स्तनपानाचे फायदे आणि योग्य पद्धतींबाबत माहिती देण्यात येत आहे.

यावेळी डॉ. उल्हास पाटील यांनी स्तनपान ही बालकासाठी निसर्गाने दिलेली सर्वोत्तम भेट असून प्रत्येक आईने त्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, असे सांगितले. जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे माता, कुटुंबीय आणि समाजामध्ये स्तनपानाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.


 

Next Post
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add