• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनोखी लग्न पत्रिका!.. तुम्हीच पहा काय आहे या लग्नपत्रिकेत.. VIDEO

सर्वत्र कौतुकाचा ठरला विषय

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 11, 2022
in जळगाव जिल्हा, राज्य, सामाजिक
0
अनोखी लग्न पत्रिका!.. तुम्हीच पहा काय आहे या लग्नपत्रिकेत.. VIDEO

हेमंत पाटील | जळगाव, दि.11 – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आता सुरुवात झाली असून लग्नसमारंभ मोजक्या पाहुण्यांमध्ये करावे लागत आहे. पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले जळगावातील अनिल केर्‍हाळे व पत्नी शारदा यांनी आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका अगदी अनोख्या पद्धतीने तयार करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केलायं.

केर्‍हाळे यांची कन्या निकिता हिचा विवाह चेतन यांच्याशी पाच फेब्रुवारीला नियोजित असून त्यासाठी तयार करण्यात आलेली लग्नपत्रिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

लग्नपत्रिकेची रचना कोवीड लसीकरण प्रमाणपत्रा प्रमाणे करण्यात आली असून, यात विवाह सोहळा संबंधीची माहिती, वधू-वरांची नावे याचा उल्लेख तर आहेच, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोवीड संदर्भात जनजागृती करत मास्क आणि सॅनिटायझरचा वापर, सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लसीकरण प्रमाणपत्रावरील प्रतिमेची मांडणी करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे ‘तुमचे लसीकरण हाच आमच्यासाठी आहेर’.. असा भावस्पर्शी मजकूर या पत्रिकेत छापला आहे.

या अनोख्या जनजागृतीपर लग्नपत्रिकेमुळे अनिल आणि शारदा केर्‍हाळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वांनीच दक्ष राहून, लसीकरणासह आपल्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे.

Next Post
संस्कृती मंत्रालय, भारत सरकार तर्फे राष्ट्रीय रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न

संस्कृती मंत्रालय, भारत सरकार तर्फे राष्ट्रीय रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add