• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!

आपले परिवार वाचनालयातर्फे साने गुरुजी स्मृती सप्ताह व कर्मयोगी वासुदेव गुरुजी स्मृतिदिन सोहळा संपन्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 8, 2026
in जळगाव जिल्हा
0
भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!

​भुसावळ, (प्रतिनिधी) : येथील आपले परिवार सार्वजनिक वाचनालयातर्फे साने गुरुजी स्मृती सप्ताह व कर्मयोगी वासुदेव गुरुजी स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘गुणगौरव यशोत्सव – उत्सव गुणवत्तेचा’ व पुरस्कार प्रदान समारंभ रविवारी नंदनवन कॉलनीतील डॉ. बी. व्ही. खाचणे सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था, प्राध्यापक, शिक्षक आणि ५ युवा रत्नांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण घनश्याम पाटील यांना यंदाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद सदस्य आमदार एकनाथराव खडसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, रावेरचे आमदार अमोल जावळे, लोढा ग्रुपचे डेप्युटी सी.ई.ओ. तुषार येवले, डॉ. पंकज पाटील, प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, महेश फालक, पी. व्ही. पाटील, गणेश नेहते, ललित पाटील व सुहास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

​सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचा त्रिवेणी संगम..
कार्यक्रमाची सुरुवात माता शारदा, श्री गजानन महाराज, साने गुरुजी व कर्मयोगी वासुदेव गुरुजी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली. प्रवेशद्वारावर मान्यवरांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. नुपूर भालेराव हिच्या गणेशवंदनेने वातावरण संगीतमय झाले. प्रास्ताविकात शांताराम पाटील गुरुजी यांनी वाचनालयाच्या यशस्वी वाटचालीचा व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. दि. ५ ते ११ जून दरम्यान साजऱ्या होत असलेल्या या सप्ताहात ४५ गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व पॅड देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वतीने गुंजन अत्तरदे हिने मनोगत व्यक्त केले.

​विविध गौरव पुरस्कारांचे वितरण..
या सोहळ्यात मान्यवरांना शाल, कै. गोदावरी पाटील यांचे आत्मचरित्रात्मक ‘हितगुज’ पुस्तक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पुरस्कारार्थींची यादी खालीलप्रमाणे:
​कर्मयोगी वासुदेव गुरुजी संघटक गौरव पुरस्कार २०२६: माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळ (तळवेल), स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ (खडका), सकल लेवा महिला मंडळ (भुसावळ) आणि लेवा प्रतिष्ठान (भुसावळ).
​प्राध्यापक व उपप्राचार्य गौरव: प्रा. डॉ. सुनील मधुकर नेवे (भालोद कॉलेज) व प्रा. शैलेश रमेश राणे (सरदार जी. जी. हायस्कूल, रावेर).

​मुख्याध्यापक गौरव पुरस्कार: मा. जयंत रमेश चौधरी (वड्री) व डॉ. शिवचरण मधुकर उज्जैनकर (पारंबी).
​शिक्षक गौरव पुरस्कार: डॉ. विजय काशिनाथ बागुल, ललित अनंत बढे, राजेंद्र गुलाबराव साळी, ज्ञानदेव रघुनाथ धांडे, योगिता ज्ञानदेव झांबरे, हेमांगी अशोक पाटील, संजीवनी संजय यावलकर आणि कवयित्री शुभांगी सुनील सरोदे.
​युवा गौरव पुरस्कार: तुषार सुधाकर येवले (डेप्युटी सी.ई.ओ., लोढा ग्रुप), वैभव किशोर ढाके, विनायक शंकर पाचपांडे, डॉ. लोकेश सुरेश नेहते आणि सतीश घनश्याम महाजन.

​कर्मयोगींचे कार्य समाजाला दिशा देणारे: मान्यवरांचे प्रतिपादन..
आपल्या मनोगतात डेप्युटी सी.ई.ओ. तुषार येवले यांनी प्रतिकूल परिस्थितीतून सी.ई.ओ. पदापर्यंतच्या प्रवासात मित्रांची साथ कशी मोलाची ठरली, याचे अनुभव कथन केले. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी आई-वडिलांच्या स्मृती जागवताना भावूक होत, “चांगलं पाहिलं, बोललं आणि ऐकलं की चांगलंच होतं” हा गोदावरी आईंचा विचार जीवनाला दिशा देणारा असल्याचे सांगितले.

​अध्यक्षीय भाषणात आमदार एकनाथराव खडसे यांनी कर्मयोगी वासुदेव गुरुजी यांच्या अफाट शैक्षणिक कार्याचा गौरव केला. वासुदेव गुरुजींनी ज्या ठिकाणी सेवा दिली, तिथे कार्याचा सुगंध दरवळला, असे सांगत त्यांनी विवरे गावाने देशाला अनेक रत्ने दिल्याचा उल्लेख केला. तसेच वाचनालयाच्या भविष्यातील कार्यासाठी मदतीचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे आलेल्या प्रत्येक उपस्थिताला वाचनालयाचा लोगो असलेला बॅच, ‘हितगुज’ हे पुस्तक आणि ‘गोदावरी’ साप्ताहिकाचा अंक भेट म्हणून देण्यात आला. आकर्षक रांगोळ्या आणि माहितीपूर्ण भित्तीपत्रकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन वर्षा लोखंडे, नगरसेविका आशा पाटील व येवले यांनी केले. आभार प्रदर्शन शैलेंद्र महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रमोद सरोदे, अजय वाघोदे, सतीश ढाके, उदय बोंडे, अनिल फेगडे, पंकज अत्तरदे व अजय पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Next Post
फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ | शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ | शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ | शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात
कृषी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ | शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

June 8, 2026
भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!
जळगाव जिल्हा

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!

June 8, 2026
खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे
कृषी

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे

June 7, 2026
हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group