• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

व्यसनाच्या गर्तेतून नवजीवनाकडे: डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात तरुणावर यशस्वी उपचार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 9, 2026
in आरोग्य
0
व्यसनाच्या गर्तेतून नवजीवनाकडे: डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात तरुणावर यशस्वी उपचार

जळगाव, (प्रतिनिधी) : मद्याच्या अति सेवनामुळे आयुष्य विस्कळीत झालेल्या एका तरुणाच्या उपचाराला डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांनी योग्य दिशा देत त्याला नवजीवन दिल्याची घटना समोर आली आहे. याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील देवीदास नामक ४७ वर्षीय तरूणाला सतत मद्यपानाची सवय, वागण्यात अचानक बदल, अनियंत्रित बडबड, तसेच हातपाय थरथरणे अशा लक्षणांमुळे संबंधित तरुणाची मानसिक आणि शारीरिक स्थिती गंभीर बनली होती.

कुटुंबीयांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तरुणाला तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल केले. याठिकाणी मानसोपचार विभागातील तज्ज्ञ डॉ. उमा चांदूरकर, डॉ. हिमांशू जाधव, डॉ. हुमेद महाडीक, डॉ. ऋचिता आटे, डॉ. देवांश गणात्रा, डॉ. रैशल श्रीवास्तव, डॉ. राठोड यांनी रूग्णाच्या प्रारंभी वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये एमआरआय तपासणीसह विविध चाचण्या करण्यात आल्या. तपासणीनंतर संबंधित तरुणाला अल्कोहोल युज डिसऑर्डर विथ एन्झायटी डिसऑर्डर असा आजार असल्याचे निदान करण्यात आले.

निदानानंतर मानसोपचार विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने उपचाराची जबाबदारी स्वीकारली. या उपचारामध्ये औषधोपचारासोबतच समुपदेशन, मानसिक आधार आणि जीवनशैलीत बदल यावर विशेष भर देण्यात आला. सुरुवातीच्या काळात तरुणाला अस्वस्थता, चिडचिड, झोपेच्या तक्रारी जाणवत होत्या; मात्र डॉक्टरांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि कुटुंबाच्या सहकार्यामुळे त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली.

काही दिवसांच्या उपचारानंतर तरुणाच्या वागण्यात सकारात्मक बदल दिसून आला. हातपाय थरथरणे कमी झाले, अनावश्यक बडबड थांबली आणि मानसिक स्थैर्य मिळू लागले. विशेष म्हणजे, मद्यपानाची तीव्र इच्छा देखील नियंत्रणात आली. उपचाराला चांगला प्रतिसाद मिळाल्याने संबंधित तरुण आता पूर्णपणे व्यसनमुक्त झाला असून, तो पुन्हा सामान्य आयुष्य जगण्यास सक्षम झाला आहे.

▪️याबाबत मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले की, मद्याचे अतिसेवन केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम करते. योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यास अशा रुग्णांना पूर्णपणे व्यसनमुक्त करता येते. कुटुंबीयांचे सहकार्य, रुग्णाची इच्छाशक्ती आणि तज्ज्ञांचा योग्य मार्गदर्शन हा उपचाराचा महत्त्वाचा भाग आहे.या यशस्वी उपचारामुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला आहे.
– डॉ. ऋचिता आटे, डॉ.उल्हास पाटील रूग्णालय.

Next Post
कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला

कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला

ताज्या बातम्या

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
आरोग्य

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 9, 2026
फालीच्या अधिवेशनाचा समारोप; इन्व्होशन सादरीकरणात कोल्हापूरची शाळा तर बिझनेस प्लॅनमध्ये जळगावची अनुभूती प्रथम
कृषी

फालीच्या अधिवेशनाचा समारोप; इन्व्होशन सादरीकरणात कोल्हापूरची शाळा तर बिझनेस प्लॅनमध्ये जळगावची अनुभूती प्रथम

June 9, 2026
भुसावळात रविवारी रंगणार ‘नेवे-वाणी समाज मंडळा’च्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा थरार
क्रिडा

भुसावळात रविवारी रंगणार ‘नेवे-वाणी समाज मंडळा’च्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा थरार

June 9, 2026
६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण
आरोग्य

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

June 9, 2026
खगोलप्रेमींसाठी पर्वणी: देशभरात आज दिसणार उघड्या डोळ्यांनी ‘शुक्र-गुरु’ ग्रहांची महायुती
जळगाव जिल्हा

खगोलप्रेमींसाठी पर्वणी: देशभरात आज दिसणार उघड्या डोळ्यांनी ‘शुक्र-गुरु’ ग्रहांची महायुती

June 9, 2026
फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ | शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात
कृषी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ | शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

June 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group