• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 14, 2026
in जळगाव जिल्हा
0
कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!

​जळगाव, (प्रतिनिधी) : “जळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर बनवणे हे आपले प्राथमिक ध्येय आहे. स्वच्छता कामात कुठल्याही प्रकारचा नियमभंग, कर्मचाऱ्यांची खोटी हजेरी किंवा कामातील हलगर्जीपणा यापुढे अजिबात खपवून घेतला जाणार नाही,” असा कडक इशारा उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला दिला आहे.

​शुक्रवारी महापालिकेतील उपमहापौर दालनात आरोग्य विभागाची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. यावेळी उपमहापौरांनी सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक, युनिट प्रमुख आणि स्वच्छता निरीक्षक यांना कामात तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीत उपमहापौरांनी प्रामुख्याने कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर बोट ठेवले. “कामगारांची हजेरी आता मुकादमांनी न घेता स्वच्छता निरीक्षकांनी स्वतः घ्यावी. यामुळे बोगस हजेरीला चाप बसेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, जे कर्मचारी सतत गैरहजर राहतात किंवा कामात टाळाटाळ करतात, त्यांना अधिकाऱ्यांनी पाठीशी घालू नये, अशा कडक सूचनाही त्यांनी दिल्या.

शहरातील कचरा व्यवस्थापनाबाबत बोलताना उपमहापौर म्हणाले की, प्रत्येक भागात घंटागाडी नियमितपणे फिरली पाहिजे. रस्ते आणि गटारींची स्वच्छता केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्ष दिसली पाहिजे. मक्तेदारांकडून होणारी अनियमितता रोखण्यासाठी प्रशासनाने अधिक दक्ष राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

“स्वच्छतेच्या कामात खोटी माहिती देणे किंवा कर्तव्यात कसूर करणे महागात पडेल. यापुढे अशा बाबी निदर्शनास आल्यास कडक कायदेशीर किंवा प्रशासकीय भूमिका घेतली जाईल,” असे सांगत उपमहापौरांनी अधिकाऱ्यांमध्ये शिस्त आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या बैठकीमुळे आता जळगाव शहरातील स्वच्छता मोहिमेला नवी गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
​

Tags: #municipalcorporationJalgaon

ताज्या बातम्या

कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!
जळगाव जिल्हा

कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!

March 14, 2026
अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई
गुन्हे

अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई

March 14, 2026
जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

March 13, 2026
नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’
खान्देश

नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’

March 13, 2026
महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
जळगाव जिल्हा

महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

March 13, 2026
घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन
जळगाव जिल्हा

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन

March 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group