• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 23, 2026
in जळगाव जिल्हा
0
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

जळगाव, (प्रतिनिधी) : थोर समाजसुधारक, स्वच्छता आणि सेवाभावाचे प्रणेते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जळगावात गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात गाडगे महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या सामाजिक कार्याचे स्मरण करण्यात आले.

समाजातील अंधश्रद्धा, अस्वच्छता व सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी आपल्या कृतीतून समाजप्रबोधनाचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेच्या कार्यालयात गाडगे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांनी, राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या सेवाभावी आणि समाजजागृतीच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. “स्वच्छता, शिक्षण आणि माणुसकीचा संदेश देणारे गाडगे महाराजांचे विचार आजच्या काळात अधिकच प्रेरणादायी आहेत,” असे त्यांनी सांगितले. संस्थापक महासचिव भगवान सोनार यांनी, गाडगे महाराजांच्या सामाजिक चळवळीची माहिती देत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. केंद्रीय कार्याध्यक्ष सागर ओतारी यांनी आपल्या मनोगतात, संत गाडगे महाराजांनी समाजातील सर्व घटकांसाठी काम केले. त्याच प्रमाणे पत्रकारांनी देखील काम करावे, असे आवाहन केले.

या प्रसंगी संघटनेचे संस्थापक खजिनदार ललित खरे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष दीपक कुलकर्णी, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पाटील, जळगाव तालुका सचिव योगेश सुने, जळगाव शहर उपाध्यक्ष निखिल मोरे, शहर सचिव योगेश चौधरी, लालचंद अहिरे, विकास चव्हाण, मनोज जोगी, किशोर शिंपी आदी पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

Next Post
जळगाव हादरले! मूल पळवण्याच्या अफवेतून तरुणाची ‘मॉब लिंचिंग’; आव्हाण्यात जमावाच्या मारहाणीत मृत्यू

जळगाव हादरले! मूल पळवण्याच्या अफवेतून तरुणाची 'मॉब लिंचिंग'; आव्हाण्यात जमावाच्या मारहाणीत मृत्यू

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group