• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पद्मालयच्या जंगलात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; जिल्ह्यात खळबळ

ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 4, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
पद्मालयच्या जंगलात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; जिल्ह्यात खळबळ

​जळगाव, (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील सुप्रसिद्ध पद्मालय गणेश देवस्थान परिसरातील जंगलात एका ३० वर्षीय अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा प्रकार नियोजनबद्ध केलेला खून असून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पेटवून दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

​गुराख्यामुळे उघडकीस आली घटना..
​मिळालेल्या माहितीनुसार, पद्मालय ते नागदुली रस्त्यावरील जंगलात गुरुवारी काही गुराखी आपली गुरे चारण्यासाठी गेले होते. यावेळी एका गुराख्याला मानवी अवशेष दिसले. जवळ जाऊन पाहिले असता, एका महिलेचा कमरेपासून तोंडापर्यंतचा भाग पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होता, तर केवळ पाय सुस्थितीत दिसत होते. या धक्कादायक प्रकारानंतर गुराख्यांनी तातडीने ग्रामस्थांना आणि एरंडोल पोलीस स्टेशनला माहिती दिली.

​वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची धाव..
​घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, एरंडोलचे निरीक्षक निलेश गायकवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

​तपासासाठी तांत्रिक पथके तैनात..
​घटनेचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तात्काळ श्वानपथक, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, ठसे तज्ज्ञ यांचे पथके पाचारण केले. दरम्यान ​प्राथमिक अंदाजानुसार, ज्वलनशील पदार्थाचा वापर करून मृतदेह जाळण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

​ओळख पटवणे हेच मोठे आव्हान..
​सदर महिलेचा चेहरा आणि शरीराचा वरचा भाग जळालेला असल्याने तिची ओळख पटवणे पोलिसांसाठी कठीण झाले आहे. हा खून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असल्याने याला ‘परफेक्ट मर्डर’च्या दृष्टीने पाहिले जात आहे. जिल्ह्यातील बेपत्ता महिलांच्या तक्रारींची आता पोलीस पडताळणी करत असून, आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
प्रेमाचा तगादा ठरला जीवघेणा; तृतीयपंथीयाची हत्या करून मृतदेह जाळणारा संशयित जेरबंद

प्रेमाचा तगादा ठरला जीवघेणा; तृतीयपंथीयाची हत्या करून मृतदेह जाळणारा संशयित जेरबंद

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group