• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

खोट्या नोटा देऊन व्यापाऱ्याला सहा लाखांचा गंडा; जळगावमधी प्रकार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 4, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
खोट्या नोटा देऊन व्यापाऱ्याला सहा लाखांचा गंडा; जळगावमधी प्रकार

​जळगाव, (प्रतिनिधी) : बारदान खरेदीच्या बहाण्याने एका व्यापाऱ्याला जाळ्यात ओढून, खऱ्या नोटांच्या बदल्यात मुलांच्या खेळण्यातील नोटा देऊन सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील काव्यरत्नावली चौक परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी तीन जणांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​प्रजापत नगर भागातील रहिवासी आणि बारदान विक्रेते प्रकाश श्रीराम प्रजापत (५०) यांना रवींद्र तायडे नामक व्यक्तीने संपर्क साधला होता. तायडेने आपल्याकडे २ लाख नग बारदान विक्रीसाठी असल्याचे सांगून प्रजापत यांचा विश्वास संपादन केला. २३ जानेवारी रोजी तायडे आणि त्याचा एक साथीदार प्रजापत यांच्या घरी आले. व्यवहाराची बोलणी करण्यासाठी त्यांनी प्रजापत यांना काव्यरत्नावली चौकात नेले.

​अशी झाली फसवणूक..
​काव्यरत्नावली चौकात या टोळीचा तिसरा साथीदार आधीच उपस्थित होता. ठगांनी प्रजापत यांना सांगितले की, बारदान खरेदीच्या व्यवहारासाठी त्यांना ५०० रुपयांच्या नोटांची आवश्यकता आहे. ​ठगांनी प्रजापत यांच्याकडून १ लाख रुपये बयाणा म्हणून घेतले. ​उर्वरित ५ लाख रुपये (१०० आणि २०० च्या नोटांच्या स्वरूपात) घेऊन त्या बदल्यात ५०० रुपयांच्या नोटांचे १० बंडल असलेली एक पिशवी त्यांना दिली.

​पिशवी उघडली अन पायाखालची जमीन सरकली..
​दुसऱ्या दिवशी प्रजापत यांनी घरी पिशवीतील पैसे तपासले असता त्यांना मोठा धक्का बसला. प्रत्येक बंडलच्या वरची फक्त एकच नोट खरी होती, तर आतील सर्व नोटांवर ‘भारतीय बच्चो का बँक’ असे लिहिलेले होते. खेळण्यातील नोटा पाहून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

​धक्क्याने प्रकृती खालावली
​सहा लाख रुपये गमावल्याच्या तणावामुळे प्रकाश प्रजापत यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेऊन प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी २ फेब्रुवारी रोजी पोलिसांत धाव घेतली. प्रजापत यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रवींद्र तायडे आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील करत आहेत.

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
पद्मालयच्या जंगलात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; जिल्ह्यात खळबळ

पद्मालयच्या जंगलात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; जिल्ह्यात खळबळ

ताज्या बातम्या

झेलम एक्सप्रेसमधील बॅग चोरीचा छडा; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने ‘गोल्डन’ला ठोकल्या बेड्या
गुन्हे

झेलम एक्सप्रेसमधील बॅग चोरीचा छडा; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने ‘गोल्डन’ला ठोकल्या बेड्या

February 9, 2026
‘शेगावमय’ झाले जळगाव; इंद्रप्रस्थ नगरात श्रींच्या पालखीचा जल्लोष!
खान्देश

‘शेगावमय’ झाले जळगाव; इंद्रप्रस्थ नगरात श्रींच्या पालखीचा जल्लोष!

February 9, 2026
विकसित भारत संकल्पनेत महाराष्ट्र ठरणार देशाच्या प्रगतीचे इंजिन; केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मांडले अर्थसंकल्पाचे महत्त्व
खान्देश

विकसित भारत संकल्पनेत महाराष्ट्र ठरणार देशाच्या प्रगतीचे इंजिन; केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मांडले अर्थसंकल्पाचे महत्त्व

February 7, 2026
प्रेमाचा तगादा ठरला जीवघेणा; तृतीयपंथीयाची हत्या करून मृतदेह जाळणारा संशयित जेरबंद
खान्देश

प्रेमाचा तगादा ठरला जीवघेणा; तृतीयपंथीयाची हत्या करून मृतदेह जाळणारा संशयित जेरबंद

February 7, 2026
पद्मालयच्या जंगलात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; जिल्ह्यात खळबळ
खान्देश

पद्मालयच्या जंगलात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; जिल्ह्यात खळबळ

February 4, 2026
खोट्या नोटा देऊन व्यापाऱ्याला सहा लाखांचा गंडा; जळगावमधी प्रकार
खान्देश

खोट्या नोटा देऊन व्यापाऱ्याला सहा लाखांचा गंडा; जळगावमधी प्रकार

February 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group